विजय माहूरे सेलू:
महिना होत आहे सतत पाऊस आहे शेतातील पिके पाण्याखाली आले पीक विमा कंपनी कडे तक्रारी केल्या पण कधी होणार सर्वे, आणि पावसात कसा करणार पंचनामा असा प्रश्न निर्माण झाल्याने ओला दुष्काळ जाहीर होणार काय या कडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सेलू तालुक्यात सोयाबीन व तुरीचा पेरा मोठ्या प्रमाणात आहे सततचा पाऊस तूर पिकाला घातक आहे अनेकांच्या शेतातील तुरीचे रोपटे जळालेले आहे तर सोयाबीन चे पीक हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे सतत एक महिना होत असून पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही आता तर श्रावण महिना लागला आहे या महिन्यात चांगला पाऊस असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे त्या मुळे खरिपातील पिकापासून उत्पादन घेण्याची आशा धूसर होत आहे शेतकऱ्यांच्या शेतातील कामे ठप्प असून लावलेला खर्च निघतो की नाही या द्विधा मनस्थितीत शेतकरी सापडला आहे . बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनी कडे नुकसानीच्या तक्रारी केल्या आहे तर काही शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या पण या दोन्ही विभागाचे शेतकरी शेतातील रस्त्यांनी दलदल असल्याने शेतकऱ्यांच्या शेत शिवारात जाणार कसे हा प्रश्न आहे जर पोहचता येत नसेल तर पंचनामे होणार कसे पंचनामे केले नाही तर नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बॉक्स: ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी लोक प्रतिनिधी आवाज उठवतील काय या कडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे .सलग तीन वर्ष शेतकऱ्यांना शेतातील उत्पन्न घेता आले नाही म्हणून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.
जुलै महिन्यात व आगष्ट महिन्यात आज पर्यंत झालेल्या सततच्या पावसामुळे तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या नुकसानी चा अंदाज पाहता बाधित क्षेत्र ७७०६ हे. मध्ये नुकसान झाले असून शेतकरी संख्या ३३८४ आहे. सोयाबीन २६३८ हे. तूर ८४७ हे.कपाशी ३९२६ हे. इतर ८ हे.क्षेत्र बाधित झाले अजूनही सर्वेक्षण सुरू असून हा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही असे तालुका कृषी अधिकारी रवींद्र राऊत यांनी सांगितले.