भंडारा (हंसराज रामटेके)
गणेशपूर, रमाबाई आंबेडकर वॉर्ड येथे सायंकाळी 6:15 वाजता तीन अध्यात व्यक्तींनी अंकुश शहारे यांच्या घरावर नशेच्या भरात गोळ्या झाडल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी घटनेची माहिती देताना सांगितले की, ही घटना मागील वर्षी घडलेल्या कटकवार यांच्या हत्येच्या बदल्यात घडल्याचा प्राथमिक तपासात खुलासा झाला आहे.
आरोपींनी चिराग गजभिये यांना मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या घराची ओळख पटवण्यात ते अपयशी ठरले, त्यामुळे चुकीच्या घरावर गोळीबार झाला. फिर्यादी सम्राट सहारे यांच्या तक्रारीनुसार, आरोपी सावंत लक्ष्मण कटकवार (वय 50 वर्ष), चेतन तिघरे (वय 24 वर्ष), आणि आर्या (वय 38 वर्ष) यांच्यावर भारतीय दंड संहितेचे कलम 109 BNS आणि आर्म्स एक्टच्या कलम 3/25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडे देशी कट्टा चा वापर केल्याची माहिती मिळालीआहे.
घटनेच्या वेळी आरोपी अर्बन बँकजवळून नशेत मोटारसायकलवर स्वार होऊन आले होते. त्यांनी ओरडत ओरडत गोळीबार केला आणि आजूबाजूच्या दुकानांना बंद करण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील नागरिकांनी पोलीस चौकी स्थापनेची मागणी केली आहे.
तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे. या घटनेनंतर नागरिकांच्या सुरक्षेसाठी अधिक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.