नागभीड:-तालुक्यातील बाळापूर खुर्द येथे आज (५.ऑगस्ट) सोमवारी सकाळी सात वाजता एका बंद घरात बिबट्याचे तिन पिल्ले आढळल्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील काही दिवसांपासून या गावात बिबट्याची वर्दळ सुरू होती. याच काळात गावातील अनेक पाळीव प्राणी या पिल्लांच्या मादी बिबट्याने आपले भक्ष बनविले आहे. त्यामुळे गावात दहशतीचे (भितीचे ) वातावरण निर्माण झाले होते. मात्र बिबट्याची तीन पिल्ले डिमदेव सेलोटे यांच्या गुरांच्या गोठयात सापडल्याने गावातील लोकांनी पाहण्यासाठी गर्दी केली आहे. मात्र बिबट्याचा आपल्या पिल्ल्यासाठी पुन्हा गावात धुमाकूळ घालण्याची भिती नाकारता येत नाही त्यामुळे वन विभागाने घटनास्थळी चमु तैनात केली असून गावकर्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात येत आहे. गावातील या वाघीणीने मारलेल्या गुरांमध्ये लोकेश ठवरे, काशिनाथ तरोणे,दिलीप सोनकर , शंकर वाटकर,मंगेश गोंगल यांच्या सह अनेकांच्या कोंबड्या-कुत्रे ठार मारले असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे. बिबट्याच्या या हल्ल्यामुळे गावातील लोक घाबरले असुन त्यांना सुरक्षेची भीती वाटत आहे.