• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home नागपूर

नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरण:पैसा वसुलीसाठी बेमुदत ठिय्या आंदोलन; शेतकऱ्यांना 2 महिन्यात पैसे वाटप करण्याची मागणी

Ashish Ghume by Ashish Ghume
August 2, 2024
in नागपूर
Reading Time: 1 min read
A A
0
नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरण:पैसा वसुलीसाठी बेमुदत ठिय्या आंदोलन; शेतकऱ्यांना 2 महिन्यात पैसे वाटप करण्याची मागणी
Spread the Information

नागपूर (वैभव शहाणे) :- नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळ्यात न्यायालयाने आरोपी ठरवलेले राज्याचे माजी मंत्री काँग्रेसचे सुनील केदार यांच्याकडून बँक घोटाळ्यातील पैश्याच्या वसुलीसाठी २ ऑगस्ट पासून सावनेर येथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले. बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुनील केदार यांच्याकडून घोटाळ्याचे १५३ कोटी व व्याजाचे १४४४ कोटी रुपयांची वसुली करून पीडित शेतकरी व खातेदारांना २ महिन्यात वाटप करण्यात यावे, ही प्रमुख मागणी पीडित आंदोलनकर्त्यांची आहे. सोबतच वसुलीच्या कारवाईसाठी राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण केल्या जात आहे.

RelatedPosts

टेबूरडोह येथे ३७ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट

रस्त्यावर तडफडणाऱ्या महिलेला मिळाला मदतीचा हात; आमदार अडबाले ठरले आधार

नागपूर शहर पोलिसांतर्गत ‘ऑपरेशन यू-टर्न’ (Operation U-Turn) अंतर्गत अमली पदार्थ चाचणी उपक्रमाचा शुभारंभ; बेदरकार ड्रायव्हिंगला आळा घालण्यासाठी पाऊल

आंदोलनाच्या सुरुवातीला पीडित शेतकरी व खातेदारांचा बैलबंडी धडक मोर्चा काढण्यात आला आणि उपविभागीय अधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी संपत खलाटे यांना हजारोंच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. बँक घोटाळ्यात न्यायालयाने दोषी ठरवलेल्या सुनील केदार यांच्याकडून वसुलीची कारवाई करावी यासाठी भाजपाचे प्रवक्ते तसेच ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात पीडित शेतकरी, खातेदार व नागरिक या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

सुनील केदार यांनी केलेल्या २२ वर्षांपूर्वीच्या १५३ कोटीच्या घोटाळ्याचे आज १४४४ कोटी झालेले आहे. सहकार कायद्याच्या अंतर्गत न्यायालयाने दोषी ठरविलेल्या व्यक्तीकडून ते वसूल करण्याच्या दृष्टीने सहकारी संस्था अधिनियम १९६६ चे कलम ८८ अंतर्गत कायदा बनलेला आहे. या वसुलीच्या कायद्यांतर्गत सुनील केदार यांच्याकडून २ महिन्यात वसुली करून त्याचे वाटप पीडित शेतकरी आणि खातेदारांना करावे, ही आमची मागणी आहे असे डॉ .आशिष देशमुख यांनी सांगितले.

आता न्यायालयाने सुनील केदार यांच्याकडून व्याजासकट वसुलीचे आदेश दिले आहे. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने दोषसिद्धीला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यांना पाच वर्षांची शिक्षासुद्धा ठोठावली आहे. वसुलीसंदर्भात ३० जुलै २०२४ ला सुनावणी ठेवली होती. मात्र सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ती पुढे ढकलली. केदारांना वाचवण्यासाठी दिलीप वळसे पाटील प्रयत्न करीत असल्याची शंका त्यानिमित्ताने निर्माण होते असे देशमुख म्हणाले. यावेळी डॉ. राजीव पोतदार, मनोहर कुंभारे, अरविंद लोधी, तुषार उमाटे, प्रकाशजी टेकाडे, विजयबाबु देशमुख, अशोकजी तांदूळकर, ओमप्रकाश कामडी, किशोर चौधरी, देवराव रडके, रामराव मोवाडे, संदीप उपाध्याय, हिमेश यावलकर, प्रमोद हत्ती, प्रफुल्ल मोहटे, अनिस , जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्यातील पीडित कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, ठेवीदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते.

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवलेले काँग्रेसचे घोटाळेबाज माजी आमदार सुनील केदार यांच्याकडून तत्काळ व्याजासह 1444 कोटी रुपयांची वसुली करून पीडित शेतकरी व ठेवीदारांना त्याचे दोन महिन्याच्या आत वाटप करावे, या मागणीसाठी सावनेर येथे बेमुदत ठिय्या आंदोलनात सहभागी झालो. सर्वात अगोदर मी शेतकरी आहे, त्यामुळे सामान्यांना, कष्टकऱ्यांना, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मी स्वतःला कटिबद्ध समजतो.

डॉ .आशिष देशमुख

Previous Post

फेरफार करण्यासाठी मागितली लाच;तलाठ्यासह मंडळ अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात

Next Post

गर्भवती महिलेसाठी खाटेची कावड करून दोन किलोमीटर पायपीट;गडचिरोलीतील विदारक चित्र

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
गर्भवती महिलेसाठी खाटेची कावड करून दोन किलोमीटर पायपीट;गडचिरोलीतील विदारक चित्र

गर्भवती महिलेसाठी खाटेची कावड करून दोन किलोमीटर पायपीट;गडचिरोलीतील विदारक चित्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1