गोंडपिपरी – सुरज माडूरवार :- एकीकडे चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या दहा दिवसापासून पावसाने कहर केला असून शेतीसह मानवी जीवन विस्कळीत झाले आहे.शाशन,प्रशासन स्तरावरून परिस्तिथी हाताळण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली असतानाही दुसरीकडे लघु पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपनामुळे गोंडपीपरी तालुक्यातील जवळपास चार गावातील शेतकऱ्याच्या पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे.
मागील वर्षी बोरगांव -वढोली मार्गावर पाणी अडवा पाणी जिरवा योजेनेच्या माध्यमातून बंधारा बांधन्यात आला मात्र पाहिल्याचा पावसात निकृष्ठ असलेल्या या बांधकामाची पोलखोल देखील झाली.
पहिल्याच पावसात बंधारा फुटून लगतचा लिखितवाडा, वढोली, वडकुली,बोरगाव ,या चार गावातील शेतकऱ्याच्या शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान उभी असलेली शेतकऱ्याची पिकेही उध्वस्त झाली. बंधारा दुरस्तीचे काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांचेकडे केली .तब्बल पाच महिन्यानंतरही आमच्या विभागाकडे बंधारा दुरुस्ती बाबत कुठलाच निधी नसल्याचे उलट उत्तर संबधित विभागाचे अधिकाऱ्याकडून शेतकऱ्यांना देण्यात आले. या वर्षी देखील मुसळधार पावसामुळे फुटलेल्या बंधाऱ्यातून वाहत असलेले पाणी लगतच्या शेतात गेल्याने खरीप हंगामात लागवड केलेले धान,कापूस ,सोयाबीन, तुर यासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात होत आहे.
एकीकडे निसर्गाने केलेला पावसाचा कहर तर दुसरीकडे प्रशासणाच्या निष्काळजीपणाच्या धोरणामुळे बळीराजावरील होत असलेला अन्यायाची गाथा मांडावी तरी कोणाकडे असा प्रश्न उभा ठाकला जात आहे.तात्काळ बंधाऱ्याची दुरस्ती करावी शेतकऱ्यांना नुकसानीची मदत करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा वढोलीचे सरपंच राजेश कवठे यांनी दिला आहे.
दोन वर्षा पूर्वी फुटलेल्या बंधाऱ्याची दुरुस्ती व्हावी या करिता लघु पाटबंधारे विभागा कडे शेतकऱ्यांनी दोन – तीन वेळा लेखी निवेदन सादर करण्यात आले वारंवार फोन करून देखील कार्यकारी अभियंता यांचेकडून सकारात्मक पावले उचलली गेली नाही. त्यामुळे शेतकऱ्याचा वाली कुणीच नसल्याचे यावरून दिसून येत आहे.
शेतकऱ्याच्या जीवावर उठलेल्या प्रशासनाकडून न्याय मिळणे आवश्यक नाही का?असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडला आहे