• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

चार तालुक्यात हजारो हेक्टर वरील पिकांचे नुकसान;आढावा सभेत ‘ही’ माहिती आली उजेडात

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
July 29, 2024
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
चार तालुक्यात हजारो हेक्टर वरील पिकांचे नुकसान;आढावा सभेत ‘ही’ माहिती आली उजेडात
Spread the Information

अहेरी : दहा दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने जिल्हाभर दाणादाण उडवली आहे. यामुळे सर्वाधिक हानी दक्षिण गडचिरोलीत झाली आहे. तब्बल १३२ घरे कोसळली, २१ जनावरे दगावली असून एटापल्ली,अहेरी,भामरागड आणि सिरोंचा भाताच्या शेतीचे आणि अहेरी आणि सिरोंचा तालुक्यात कापसाच्या पिकांचे नुकसान झाले आहे.एकंदरीत चार तालुक्यात सुमारे १८ हजार हेक्टरवरील पिके मातीमोल झाल्याची माहिती उजेडात आली आहे.जिल्ह्यात १८ जुलैपासून पाऊस सुरू आहे. २८ जुलै अखेरपर्यंत अहेरी उपविभागातील चार तालुक्यांत झालेल्या नुकसानीचा अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी आढावा घेतला.

RelatedPosts

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

गोसेखुर्द धरणातून वाढलेला विसर्ग व प्रमुख नद्यांना आलेला पूर यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. नदी- नाल्यांकाठच्या जमिनी पाण्याखाली गेल्या. त्यामुळे सर्वत्र हाहाकार उडाला. भामरागडमधील पर्लकोटा नदीला महापूर आला असून पुलावरुन पाणी वाहत असल्याने शहराचा संपर्क तुटलेला आहे.परिसरातील शेकडो आदिवासी पाडे व गावांना जोडणारे नाले पाण्याखाली गेले आहेत. रस्ते, रपटे वाहून गेल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी अहेरीच्या तहसील कार्यालयात आढावा घेतला.यावेळी त्यांनी एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा तालुक्यांच्या तहसीलदारांशी दूरभाष्यप्रणालीद्वारे संवाद साधला, यावेळी नैसर्गिक आपत्ती नियमावलीनुसार नियमावलीनुसार पंचनामे करुन झालेल्या नुकसानीचा सविस्तर अहवाल सादर करा, असे निर्देश त्यांनी दिले.

पीक विमा दावे नाकारु नका, अन्यथा कारवाई

यावेळी पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींकडूनही आढावा घेण्यात आला. धान पिकाची भरपाई कंपनीकडून दिली जात नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी कुठल्याही स्थितीत शेतकऱ्यांना भरपाई नाकारु नका, त्यांचे दावे मंजूर करून योग्य ती भरपाई विनाविलंब अदा करा, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.

अहेरी उपविभागात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे करण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहेत. याशिवाय पीक विमा कंपनीलाही दावे नाकारू नयेत, अशी ताकीद दिली आहे. राज्य आपत्ती निवारण पथके तैनात आहेत. कोठेही अप्रिय घटना घडू नये, यासाठी प्रशासन सज्ज आहे. ३१ जुलैपर्यंत पीक विमा भरण्याची मुदत आहे. शेतकऱ्यांनी अधिकाधिक पीक विमा काढावा.
-विजय भाकरे, अपर जिल्हाधिकारी अहेरी

Previous Post

प्राध्यापक सचिन भोपये यांचे निधन

Next Post

वढोली येथील दोन बंधारे फुटले;शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1