सेलू: विदर्भाची प्रति पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र घोराड येथे दिनांक २९ ला संत नामदेव महाराज पुण्यतिथी महोत्सवाला असंख्य भाविकांची गर्दी उसळली होती.हरिनामाच्या जयघोषाने प्रति पंढरी दुमदुमली.
सदोदित भक्तीचा झरा वाहणाऱ्या प्रती पंढरी मध्ये दिनांक.२७ ते दिनांक २९ पर्यंत संत नामदेव महाराज पुण्यतिथी महोत्सव निमित विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले
संत नामदेव महाराज हे संत केजाजी महाराज यांचे पुत्र आहे विदर्भातील अनेक जिल्ह्यात संत केजाजी व त्यांचे पुत्र संत नामदेव महाराज यांच्या प्रती श्रध्दा असणाऱ्या असंख्य भाविकानी पुण्यतिथी महोत्सवाला हजेरी लावलीअसल्याने बोर तीरावर भाविकांचा मळा फुलला होता या निमित्त सोमवार दिनांक २९ ला विठ्ठल रखुमाई मंदिरात लक्ष्मण महाराज गुडवार यांनी काल्याचे किर्तन केले त्यानंतर भजनी मंडळाच्या व भाविकांच्या उपस्थितीत दिंडी प्रदक्षिणा बोर तीरावरून पुंडलिकाचे मंदिर , संत नामदेव महाराज समाधी ला प्रदक्षिणा करून गोमाता मंदिरात दहीहंडी कार्यक्रम पार पडला यानंतर भाविकांनी महाप्रसाद कार्यक्रमाचा लाभ घेतला. दिनांक ३० ला प्रक्षाळ पूजा व रात्री खिरापती ने उत्सवाची सांगता होईल
बॉक्स: विदर्भाची प्रती पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र घोराड येथे वर्षभाऱ्यात अनेक धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात त्यात श्री राम नवमी उत्सव, कार्तिक उत्सव, आषाढी एकादशी उत्सव, संत केजाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव, संत नामदेव महाराज पुण्यतिथी महोत्सव आदी कार्यक्रम होतात या सर्व कार्यक्रमांना चंद्रपूर, भंडारा, गोंदिया , यवतमाळ, आदी जिल्ह्यातून असंख्य भाविक या धार्मिक उत्सवाला हजेरी लावतात