गडचिरोली (विशेष प्रतिनिधी डॉ विष्णू वैरागडे)
जिल्हा परिषद अंतर्गत वेगवेगळ्या पदासाठी ऑक्टोबर २०२३ मध्ये ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. २९ जुलैला आयबीपीएस मार्फत घेत असलेल्या ग्रामसेवक पदासाठी परीक्षा घेण्यात येत असुन भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील परीक्षार्थींला चक्क लातुर जिल्ह्यातील परीक्षा केंद्र दिल्याने परीक्षा घेणाऱ्या एजंसी विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या पदासाठी ऑक्टोबर २०२३ मध्ये ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्या अनुषंगाने आयपीबीएस या एजंसी मार्फत आता घेत असलेल्या विभिन्न पदांच्या परीक्षार्थींना परीक्षा केंद्राची मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होत आहे. एकीकडे राज्यात मुसळधार पावसाचा सामना करावा लागत असून वाहतूक व्यवस्था खोळंबल्याने दळणवळणाची भिषण समस्या निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे निवड केलेल्या परीक्षा केंद्र व्यतिरिक्त हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या परीक्षा केंद्र दिल्याने परीक्षार्थींना प्रवासाच्या शारीरिक त्रासासह आर्थिक फटका बसणार आहे.
काल पर्यंत सुरू असलेल्या आरोग्य सेवक परीक्षेसाठी उमेदवारांना त्यांनी निवडलेल्या तीन केंद्रापैकी कुठलेही सेंटर न देता लांबचे सेंटर्स देण्यात आले होते.भंडारा, गडचिरोलीचे विद्यार्थ्यांना औरंगाबाद, धुळे, नाशिक, नांदेड आणि तिकडल्या विद्यार्थ्यांना नागपूर, चंद्रपूर अशा दुरवरच्या ठिकाणी पाठवण्यात आले.
याचीच पुनरावृत्ती परत एकदा होत असून तीच एजन्सी भंडारा, गडचिरोली, चंद्रपूरच्या विद्यार्थांना परत एकदा औरंगाबाद, धुळे, नाशिक नांदेड येथे परीक्षा केंद्र असल्याचे प्रवेशपत्र उपलब्ध आहेत.
आधीच विद्यार्थ्यांनी ९००/- ते १०००/- रू शुल्क भरले असून त्यांच्या भविष्याशी किती शासन परीक्षा घेणार हे परीक्षार्थीला समजण्यापलीकडे आहे. फक्त नोकरभरतीची जाहिरात काढून शासनाची भूमिका संपत नाही तर ज्यासाठी एवढे शुल्क घेतल्या जाते त्या संबंधित एजन्सी ने सुद्धा व्यवस्थित परीक्षा घ्यावात हे सुध्दा बघणे गरजेचे आहे.आता होत असलेले परीक्षा केंद्रचे चुकीचे व्यवस्थानेमुळे हे चुकीने झालं की हेतुपुरस्सर हा सुध्दा चौकशीचा विषय असुन यासंदर्भात ग्राम विकास मंत्रालयाने यात लक्ष घालून उमेदवारांनी निवड केलेल्या तीन केंद्रापैकी एक केंद्र देण्यात यावे अशी विद्यार्थी आणि पालक यांची मागणी आहे