परळी (प्रतिनिधी) : धनंजय मुंडे साहेब पालक मंत्री बीड व वाल्मीक अण्णा कराड यांच्या सुचनेनुसार स्थानिक विकास निधीतून दहा लक्ष रुपयांच्या सिमेंट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ राष्ट्रवादीचे नेते तथा मार्केट सदस्य, मानिक फड माऊली मुंडे,प,सदस्य गोवरधन कांदे सरपंच, अतुल दुबे सर,,शिवाजी मुंडे उप सरपंच नरेश मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
बॅंक काॅलनी येथील सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन मा.माणिक फड यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
बॅंक काॅलनी येथील रहिवाश्यांच्या रस्त्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे, येणाऱ्या काळात धनंजय मुंडे साहेब पालक मंत्री बीड व वाल्मीक आण्णा कराड यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक प्रश्न मार्गी लावु असे प्रतिपादन माणिक भाऊ फड यांनी भूमिपूजन प्रसंगी केले.
मा.माणिकभाऊ फड यांच्या हस्ते श्रीफळ फोडून सिमेंट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
रस्ता भूमिपूजन कार्यक्रमास ,बॅंक काॅलनी व,परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिमेंट रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे व नागरिकांचे ग्रा,सदस्य,नरेश मुंडे यांनी स्वागत केले व कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले.