कोरची : नगरपंचायतमध्ये दिनांक २२ फेब्रुवारीला सभापतीपदासाठी विशेष सभेचे आयोजन नगरपंचायत सभागृहात केले होते त्यामध्ये विषय समिती सभापतींच्या निवडीत काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनाच सभापती पदावर निवडण्यात आले आहे.
कुरखेडा उपविभागीय अधिकारी तथा पीठासीन अधिकारी दर्शन निकाळजे,कोरची नगरपंचायत मुख्याधिकारी डॉ. माधुरी सलामे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष सभेत काँग्रेसकडून नामनिर्देशित सदस्य म्हणून मनोज अग्रवाल तर भाजपाकडून घनश्याम अग्रवाल यांची निवड करण्यात आली आहे विशेष म्हणजे या दोन्ही नामनिर्देशित सदस्यांना ही दुसऱ्यांदा नामनिर्देशित सदस्य बनण्याची संधी मिळाली आहे.
विषय समित्यांची संख्या ठरवून त्यात नगरपंचायत उपाध्यक्ष हिरालाल राऊत यांची स्वच्छता वैद्यक आरोग्य सभापती म्हणून तर सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी कु. तेजस्विनी टेंभू्र्णे यांनी निवड झाली. धरमसाय नैताम यांच्याकडे पाणी पुवठा व जलनिस्सारण सभापती, तर भगवंती सोनार यांनी महिला व बालकल्याण सभापती म्हणून तर उपसभापती पदी कौशल्या केवास यांची निवड झाली आहे.
माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष जीवन नाट यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष,उपाध्यक्ष,सभापती व स्वीकृत नगरसेवक मनोज अग्रवाल यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच सभागृहात भाजपचे कोरची तालुका अध्यक्ष नासरुद्दीन भामानी,नगरसेवक मेघश्याम जमकातन यांनी स्वीकृत नगरसेवक घनश्याम अग्रवाल यांना शुभेच्छा दिले.
याप्रसंगी नगरपंचायत सभागृहात नवनिर्वाचित न पं अध्यक्ष हर्षलता भैसारे,उपाध्यक्ष हिरालाल राऊत,नगरसेवक नीरा बघवा,दिलीप मडावी,भगवंती सोनार,तेजस्विनी टेंभू्र्णे,कौशल्या केवास,धनराज मडावी,राष्ट्रवादीचे रामनाथ कोरचा,विनोद गुरुनुले, गोंड समाज तालुका अध्यक्ष रामसु काटेंगे,परदेशी बघवा,कांग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते गेंदलाल मडावी,प्रेमसिंग काटेंगे,वसीम शेख उपस्थितीत होते.