मांडगांव – ( वार्ताहर )
तिन दिवसांपासून वर्धा जिल्ह्यातील परिसरातील भागात पावसाने आपली कृपादृष्टी दाखवण्यात सुरुवात केली असून मांडगांव परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने नदी , नाले ओसांडून वाहत असल्याने आजही २२ जुलै रोज सोमवारला सकाळी ९ ते १ पर्यंत वाघाडी पुलावर पाणी असल्याने मांडगांव व समुद्रपुर रोडवरील वाहतूकीस ३ ते ४ तास खोळंबा निर्माण झाला होता .
२१ जुलै रोजी रात्री पावसाने चांगलेच झोडपून काढले असून तिन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पुलावर पाणी असल्याने अनेक ठिकाणांचे मार्गावर पाणी असल्याने वाहतूक बंद होती . मात्र पावसाळ्यात रोहनी नक्षत्र , मृग नक्षत्र , आद्रा नक्षत्र , मोठा पुक नक्षत्र ह्या नक्षत्रात पावसाने थोडेफार पाऊस येवून शेतकऱ्यांचे कापूस व सोयाबीन पिकाची लागवड करून शेती हिरवेगार फुलवु लागली होती . परंतु शेतामध्ये पाणी थोडे फार ही पाणी नव्हते आणि शेवटी मोठ्या पुकाच्या नक्षत्रात लहान पुक नक्षत्राच्या जोडावर लाडक्या पुक नक्षत्राने पावसाने आपली कृपादृष्टी दाखवण्यात सुरुवात करण्यात आली असून १९ , २० ,२१ आणि २२ ला ही सकाळी पाऊस सारखाच सुरू होता. त्या मुळे बोर नदी ,धाम नदी , वणा नदी ही दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या ह्या फुलुन शांतपणे आपला प्रवाह सुरू असताना छोटे मोठे नाले हे ही ओसंडून वाहत असल्याने रोड , रस्त्यावर असलेल्या पावसामुळे पुलावर पाणी असल्याने वाहतूकही खोळंबली होती . आज तिसऱ्या दिवशी ही मांडगांव – समुद्रपुर रोडवरील वाघाडी पुलावर पाणी असल्याने सकाळी ९ ते १ पर्यंत ह्या रोडवरील वाहतूक बंद झाली होती . त्यामुळे सकाळी जाणाऱ्याविद्यार्थी , सुतगीरणी मध्ये जाणारे मंजूर वर्ग यांना आल्या पावली घरीच परतावे लागले होते . नंतर १ वाजेपासून वाहतूक सुरळीत चालू झाली आहे .