सरपंचाचे कुणी ऐकेना ; गटविकास अधिकाऱ्याचे कानावर हात
झडशी : सेलू पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या झडशी केंद्रातील हिवरा (अंतरगाव) या शाळेतील प्रागणात ग्रामपंचायत मध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्याने आपल्या घरचा मलबा आणून टाकला. हा कचरा हटवून शाळेतील मुलांना स्वच्छतेचा परिपाठ देण्यासाठी शाळा समिती अध्यक्ष व मुख्याद्यापकाची पायपीठ सुरु असून प्रशासन हतबल झाले आहे.तर सरपंच्याचे कुणी एकायला तयार नाही . गटविकास अधिकारी तक्रार घ्यायला तयार नाही. त्यामुळे शाळकरी मुलांना अस्वच्छ परिसरातच आपले शिक्षणाचे परिपाठ पूर्णकरावे लागत आहे .
सविस्तर वृत्तांत असा की, हिवरा हे गाव अंतरगाव ग्राम पंचायत क्षेत्रात येत असून या ठिकाणी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे.
या ठिकाणी १ ते ४ वर्गभरतात. शाळेला प्रशस्तपटागण असून या ठिकाणी गावात पाणीपुरवठ्याचे काम करणाऱ्या इसमाने आपल्या घराच्या बांधकामातील वेस्ट मटेरियल आणून टाकले. आणि परिसरात घाण निर्माण केली. पावसाचे दिवस असल्याने शालेय परिसर स्वच्छ असणे अपेक्षित आहे. अस्वच्छता करणारा ग्राम पंचायतचा माणूस असल्याने ही समस्या निकाली निघण्यास वेळ लागणार नाही, अशी अपेक्षा असताना हा कचरा साफ करण्यास शिक्षण समितीचे अध्यक्ष अतुल बांते यांचा कस पणाला लागला आहे. हा कर्मचारी सरपंचांला ऐकत नाही. आणि गट विकास अधिकाऱ्याकडे जावे तर बाहेरूनच हाकलून लावतात, असा आरोप बांते यांनी केला आहे.
बॉक
याबाबत अंतरगाव येथील सरपंच कीर्ती शंभरकर यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, हिवरा शाळेतील मटेरियल हटविण्या संदर्भात मी स्वछता कर्मचाऱ्याला पंधरा दिवसांपूर्वीच सांगितले होते. परंतू त्यांनी ते हटविले नसावे , परत मी एकदा सांगते.
याबाबत गट विकास अधिकारी पानबुडे यांना विचारणा केलीअसता त्यांनी सांगितले की, हा प्रश्न ग्राम पंचायत स्तरावरील आहे. ऑन लाईन कामामुळे मी त्रस्त झालो आहे. काय करावे आणि काय नको करावे असे झाले आहे. हा विषय मी उद्या बघतो.
ग्राम पंचायत अंतरगाव येथे पाणी पुरवठा कर्मचारी वेगळाच आहे, परंतु त्या बदल्यात काम वेगळाच करतो. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहे. त्यांनी मलमा हटविण्यासाठी पंधरा दिवसापूर्वी सरपंच्यानी केलेल्या सूचनेची अवहेलना केली आहे. आणि वाद निर्माण केला. उचित कारवाई करावी अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अतुल बांते यांनी केली आहे