मूल प्रतिनिधी :-
मुल तालुक्यातील बोंडाळा खुर्द येथे शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे (उ.बा.ठा.) यांचे हस्ते शिवसेना शाखा फलकाचे उद्घाटन करण्यात आले,तसेच हनुमान मंदिर बोंडाळा येथे सर्व शिवसेना आजी माजी पदाधिकारी तथा शिवसैनिक यांची आढावा बैठक घेण्यात आली.
या आढ़ावा बैठकीत जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यानी येत्या २८ जुलै रोजी सुशिक्षित बेरोजगाराना रोजगारांची संधि देण्यात येणार आहे तरी होणाऱ्या रोजगार मेळावाल्या नवभारत विद्यालय मूल येथे जास्तीत जास्त संख्येने युवक,युवती वर्ग उपस्थित राहावे, आणी मेळाव्याचा लाभ घेऊन आपले आयुष्य उज्वल बनवावे असे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी गावातील काही युवकानी संदीप गिऱ्हे
यांच्या मार्गदर्शनाने प्रेरित होऊन शिवसेना(उबाठा) पक्ष्यात प्रवेश केला.उपस्थित शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार,शहर प्रमुख आकाश राम,तालुका संघटक रवि शेरकी,उपतालूका प्रमुख,गोविंदा नरसपुरे, युवी कोरडे शाखा प्रमुख बाबराळा, शाखा प्रमुख प्रतीक पाल,धर्मेंद्र पाल उपशाखा प्रमुख,प्रतिष्ठित नागरिक सुधीर पाल ज्येष्ठ नागरिक,पंकज झोड़े,अमित जंपालवार,उमेश पाल,अतुल वाकुडकर,निखिल झांपलावार,शुभम वाकुडकार, ध्रुप नगापुरे.शैलेश राऊत.प्रमोद बोरकुटे तथा गावकरी व मोठ्या संख्येत शिवसैनिक उपस्थित होते.