वर्धा –राष्ट्रवादी पक्षाचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे संपर्क मंत्री ना. प्राजक्त तनपुरे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना स्थानिक विश्राम गृह येथे त्यांच्या प्रमुख उपस्थितित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीस पदी राजु वाघमारे तर वर्धा जिल्हा कार्याध्यक्ष पदी प्रदीप वानखेडे यांची नियुक्ती ही सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. जयदेव गायकवाड यांच्या आदेशावरुन आणि प्रदेश संघटक सचिव अभिजीत फाळके पाटील, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माजी आमदार सुरेश देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, पक्षनिरिक्षक राजाभाऊ टाकसाळे व सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष धनराज तेलंग यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यावेळी राज्यमंत्री व जिल्हा संपर्क मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. पक्षाने दिलेली जबाबदारी ही समर्थपणे पार पाडत सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात व राज्यात राष्ट्रवादी पक्ष मजबूत करू असे आश्वासन याप्रसंगी नवनिर्वाचित पदधिकाऱ्यांकडून देण्यात आले. निवडीबद्दल राष्ट्रवादी वक्ता सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. कपिल मून, भूमिपुत्र संघर्षवाहिनी जिल्हाध्यक्ष योगेश घोगरे, रा. युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण काटकर, रा. युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष स्नेहल मानकर, नावेद शेख, समीर राऊत, वक्ता सेल जिल्हा कार्याध्यक्ष सतीष गवळी, पंकज मानेकर, सचिन देशमुख, सचिन घोडे, विवेक लोहकरे, शुभंम उगेमुगे, देवा अरगुडे, राजदीप वाघमारे व अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करत पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.













