कोरची:-
कोरची तालुक्यातील सोनपूर (कोटगुल) येथील रहिवासी काँग्रेसचे जेष्ठ पदाधिकारी नरपतसिंग जयलाल नैताम (६५) यांचे हृदयविकाराचे तीव्र झटक्याने आज पहाटे उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले.
त्यामुळे त्याच्या मित्रपरिवारासह कोटगुल क्षेत्रातील नागरिकांनामध्ये सर्वत्र शोककळा पसरलेला आहे. त्याचे लहान मोठें सर्वाशीच अतिशय मनमिळावू हसमुख स्वभावाची ओळख होती. त्यांनी सोनपूर ग्रामपंचायतमध्ये पंधरा वर्षे सरपंच पद भूषविले असून विद्यमानमध्ये कोटगुल आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष होते.
विशेष म्हणजे कोटगुल येथे शुक्रवारी मंडई झाली असून दुसऱ्या दिवशी सोनपूर येथे रात्रोला लोककला मंच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्या उदघाटना प्रसंगी त्यांची तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि मित्रपरिवाराशी शेवटची भेट झाली. त्यानंतर ते आपल्या घरी परत जात असताना वाटेतच हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते रस्त्यावरच बेशुद्ध पडले त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र कोटगुल येथे प्राथमिक उपचार देऊन छत्तीसगढ राजनांदगाव दवाखान्यात नेत असतांना रस्त्यावरच त्यांचे दुःखद निधन झाले. या घटनेची माहिती सकाळी तालुक्यातील मित्रपरिवाराला व रात्रोला भेट झालेल्या लोकप्रतिनिधीना मिळाली तेव्हा त्यांना विश्वासच बसत नव्हते.
त्यांच्या पश्चात एक मुलगी, दोन नातवंड आणि बराच मोठा नैताम परिवार आहे. त्यांचे पार्थिवावर आज दुपारी 2 वाजता सोनपूर येथील त्यांच्या शेतावर अंतविधी करण्यात आले. यावेळी कोरची तालुक्यातील गोंड समाजाचे अध्यक्ष रामसुरामजी काटेंगे,गडचिरोली जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष सदृद्दीन भामानी,महासचिव मनोज अग्रवाल,कोरची तालुका अनु जाती सेल अध्यक्ष आंनद मेश्राम,युवक कांग्रेसचे तालुका अध्यक्ष राहुल अंबादे,शहर समन्वयक वसीम शेख,महेरसिंग काटेंगे,कांग्रेसचे जेष्ठ नेते जुल्फिकार खेतानी,पंचायत समिती सभापती श्रावनकुमार मातलाम,तालुका समन्वयक परमेश लोहंबरे,शमसेरखा पठाण,राजेश नैताम,डॉ बिश्वास,हलामी सर व तालुक्यासह कोटगुल क्षेत्रातील असंख्य नागरिक उपस्थित होते.













