चिमूर:- तालुक्यातील काजळसर येथे श्री महर्षी वाल्मिकी ढिवर समाज काजळसर अळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दोन
दिवसीय श्री महर्षी वाल्मिकी ऋषी घटस्थापना दिन विकास मच्छि व्यवसायिक सहकारी संस्था च्या प्रांगणात दि 17 व18 फेब्रुवारी ला विविध स्पर्धा व अनेक कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला
काजळसर येथे महर्षी वाल्मिकी घटस्थापना दिन साजरा करण्याचे हे पाचवे वर्ष असून मोट्या उत्सहात याही वर्षी आयोजन करण्यात आले होते दि 17 फ्रेब्रु ला सकाळी ग्रामसफाई करून सकाळी 8 वाजता ह भ प मुखरू मारबते महाराज यांच्या हस्ते घटस्थापना करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली दुपारी 12 वाजता महिलांचे हळदी कुंकवाचे कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमाला गावातील अनेक महिलांनी भाग घेतला त्यानंतर 2 वाजता महिलांसाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली यात अनेक तरुणी आणि महिला स्पर्धकांनी भाग घेतला तसेच बाल क्रीडा स्पर्धा आशिष मेश्राम यांच्या हस्ते घेण्यात आल्या सायंकाळी सामुदायिक पार्थना व ध्यान घेण्यात आले यावर हभप मगरे महाराज यांनी मार्गदर्शन केले यानंतर रात्रोला भजन संध्या चे आयोजन करण्यात आले होते यात बेलदेव भजन मंडळ नवतला मंजुळा माता भजन मंडळ बोथली काजळसर मातोश्री संगीत भजन मंडळ काजळसर भगवती भजन मंडळ काजळसर वारकरी भजन मंडळ अडेगाव श्रीराम भजन मंडळ सिरपूर वारकरी भजन मंडळ टेकेपार गुरुमाऊली महिला भजन मंडळ काजळसर गुरुदेव भजन मंडळ काजळसर बोथली यांनी भाग घेतला होता तसेच महर्षी वाल्मिकी ऋषीची कुटी तयार करून परिसरातील लोकांचे आकर्षणाचे केंद्र बिंदू तयार केले होते यात महर्षी वाल्मिकी यांचे प्रतिमा ठेवलेली होती अनेक भाविकांनी या कुटीचे दर्शन घेतले
दि 18 फेब्रुवारी ला सकाळी गावस्वच्छता करून गावातील महिलांनी घरासमोर सडा शिंपण करून रस्त्यावर रांगोळ्या काढल्या होत्या यानंतर ढोल ताश्याच्या निनादात आणि टाळ मुदूगाच्या गजरात वाजत गाजत अनेक गावातील भजन मंडळाच्या सहकार्याने वाल्मिकी ऋषींच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात आली या मिरवणुकीत गावातील सर्व नागरिकांनी भाग घेतला होता महिलांनी रंगीत साडीचोळी घालून आकर्षक वेषभूषा साकारली होती तर पुरुषांनी सुद्धा पेहराव केला होता बाळ गोपाळ यांनी एक रंग एक गणवेश परिधान केला होता महर्षी वाल्मिकी ऋषींच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून उठला होता यानंतर दुपारी मार्गदर्शनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आले यात मान्यवर अध्यक्ष म्हणून प्रा शैलेश वाघमारे तर मार्गदर्शक म्हणून डॉ प्रकाश नान्हे एकलव्य सेना विदर्भ प्रदेश अध्यक्ष उपस्थित होते प्रमुख अतिथी आणि प्रमुख पाहुणे म्हणून आशिष ननावरे सरपंच अशोक खोब्रागडे उपसरपंच एकनाथ बोरकर श्रीकृष्ण सामुसाकडे रिमराव हटवादे नेहा सामुसाकडे पुष्प पुष्तोडे अर्चना गळमले सत्वशिला खोब्रागडे नलिनी वाटगुरे अनिल चौधरी अर्जुन शेंडे जगदिश झोडे दीपक झोडे मोरेश्वर नेवारे रामदास पाटील अनिल राठी मंदा चौधरी वैशाली नागोसे नारायण सामुसाकडे आणी अडेगाव काजळसर येथील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना नान्हे सरांनी सांगितले की समाजाची प्रगती झाली पाहिजे सुशिक्षित नवतरुण पुढे आले पाहिजे वाल्मिकी ऋषींच्या कार्यावर प्रकाश टाकला तर अध्यक्ष वाघमारे यांनी समाज प्रबोधन यावर मार्गदर्शन केले विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले यानंतर गोपाळकाला करून महाप्रसाद चा कार्यक्रम घेण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वाल्मीक ऋषी समिती आणि विकास मच्छि सह सोसायटी च्या श्रीकृष्ण सामुसाकडे काशिनाथ ठाकरे संभाजी सामुसाकडे संजय नागपुरे अध्यक्ष हिरामण गेडाम उपाध्यक्ष प्रकाश मेश्राम सचिव आदी सह सर्व सभासद कार्यकर्ते बाळ गोपाळ आबालवृद्ध गांवकरी यांनी परिश्रम घेतले तसेच सायंकाळी लहान मुलां मुलीचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते.













