वर्धा :-अठरा पगड जातींच्या लोकांना सोबत घेवून हि तों श्रींची ईच्छा म्हणत हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५१ व्या शिवराज्याभिषेक दिनी म्हणजेच ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी २० जुन रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक वर्धा येथे हिंदु साम्राज्य दिवस सोहळा साजरा करण्यात आला.
वर्तमान समाज रचने नुसार मुल भारतीय विचार दर्शनातील पण वर्तमानात जाती पंथात विभागलेल्या लोकांनी मिळून या सोहळ्यात सहभाग घेतला आणि
अठरा पगड जातींच्या मावळ्यांच्या रुपात छत्रपतींना मानवंदना देत आपण सर्व भारतीय एकच आहोत हे मूल्य पुनः प्रस्थापित करण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलले असल्याची माहिती विवेक विचार मंच चे प्रांत समन्वयक अतुल शेंडे यांनी दिली.
या शिवराज्याभिषेक सोहळ्यात मंच चे जिल्हा संयोजक राहुल मुन आणि वर्धा नगर परिषदेतील सफाई विभागातील कर्मचारी अनिल खीचरे यांच्या हस्ते महाराजांच्या महाभिषेकास सुरुवात झाली.डॉ.प्रसाद देशमुख,हिरामण पारीसे,आकाश सुखदेवे,जीवन पाहुणे,विलास भास्करवार,वामन वागदे,अनिल कावळे,अमित भित्रे,वैभव वागदे,मुकुंद पिंपळगावकर,आदी उपस्थित नागरिकांनी महाराजांचा जलाभिषेक केला. कार्यक्रमाची सांगता स्वातंत्र्यवीर सावरकर लिखीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने झाली.
सामाजिक सद्भावचे जिल्हा प्रमुख शैलेश देहाडराय यांनी कार्यक्रमाचे सुत्र संचालन केले. शिवशंभू विचार दर्शन व विवेक विचार मंच ने संयुक्त रित्या कार्यक्रमाचे आयोजन केले. सचिन लिखितकर,पाचखेडे बंधू आदी ब्राह्मण मित्र वृंदांनी महाभिषेक व संस्कार भारतीच्या संगीत व कला विधा ने महाआरती च्या सफल आयोजनास सहकार्य केले.