गोंडपिपरी (सुरज माडूरवार )
सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे.या काळात टिकायचे असल्यास विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण शिक्षण संपादन करावे असे मत प्रा.डॉ.सुभाष गीरडे यांनी व्यक्त केले. माई कोचिंग क्लास गोंडपिपरी येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते.
बारावी नंतर करीयरच्या विविध संध्या आहेत त्यापैकी व्यावसायिक समाजकार्याचा अभ्यासक्रम हा विद्यार्थ्याला जीवन जगण्याची कला शिकवून जातो त्यामुळे विद्यार्थ्यांनी असे शिक्षण घेण्याचा विचार करावा असे आवाहन माजी विद्यार्थी तथा युवा वक्ते अनिकेत दुर्गे यांनी केले. या प्रसंगी माई कोचिंग क्लासचे राकेश बांबोळे यांनी प्रास्ताविकेतून शैक्षणिक प्रगती मांडली.तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम,पुष्पगुच्छ देत सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रम सुशीलाबाई रामचंद्रराव मामीडवार समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.जयश्री कापसे यांच्या मार्गदर्शनात प्रा.डॉ.सुभाष गिरडे यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाला माई कोचिंग क्लास चे संस्थापक राकेश बांबोळे,शिक्षक आकाश मोहुर्ले, प्रज्वल बट्टे,व्यवस्थापक अमोल झाडे,अखिल झाडे, माजी विद्यार्थी युवराज बांबोळे,निखिल भडले यांच्या उपस्थितीत पार पडला.