गोंडपिपरी – (सूरज माडूरवार )
चंद्रपूर जिल्ह्यातून लगतच्या गडचिरोली जिल्ह्यात दारूची वाहतूक केली जात असताना आज (दि.५) गोंडपिपरीचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांनी मालासह एका तस्कराला करंजी बसस्थानकावर पकडले.सिद्धार्थ चोखा गेडाम असे त्या आरोपीचे नाव असून तो कोठारी येथील रहिवासी आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मुबलक प्रमाणात दारु उपलब्ध आहे.लगतच्या गडचिरोली जिल्ह्यात मात्र दारूबंदी असल्यामुळे तिथे या जिल्ह्यातून दारूची अवैध दारू वाहतूक केली जात असते.दरम्यान आष्टीकडे दारूची वाहतूक होत असल्याची माहिती गोंडपिपरी पोलिसांना मिळाली.यानंतर सपोनी रमेश हत्तीगोटे आपल्या सहकाऱ्यांसह पोलिस स्टेशन हद्दीतील करंजी बसस्टॉप गाठले.तिथे एका इसमाच्या ताब्यातील बॅगची झडती घेतली असता त्यात रॉयल कंपनीच्या ७ नग व २०० नग देशी दारूचा साठा आढळून आला.यादरम्यान एकूण किंमत १९ हजार ९५० रूपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध पोलिस स्टेशन गोंडपिंपरी येथे दारूबंदी कायद्यातर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.या घटनेचा पुढील तपास ठाणेदार हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.सदर कारवाई पोलिस हवालदार गणेश पोदाळी, गोकुल मडावी, सचिन मोहुर्ले यांनी केली आहे.