मूल प्रतिनिधी
मुल पोभुर्णा बल्लारपूर तालुक्यातील भोई समाजाचे आणि मच्छिमार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत मत्स्यमंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी मच्छिमारी करणाऱ्या समाजासाठी आणि संस्थाच्या बळकटीकरणासाठी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळेभोई समाज बांधवानी एकत्रित येत बल्लारपूर मतदार संघांचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर पाठिबा दर्शवीला.
डॉ सुधीरभाऊंनी मासेमारी समाजाच्या विकासाकरिता खूप कार्य केले भूजल विकास महामंडळ स्थापन केले, अतिवृष्टीमुळे मासेमारी संस्थांना नुकसान भरपाई देण्यात आली संस्थेच्या विकासाकरिता अनेक चांगले निर्णय घेण्यात आले त्याकरिता मासेमारी करणाऱ्या भोई समाजाने जाहीर पाठिंबाची घोषणा केली असून मान. सुधीर मुनगंटीवार यांना बहुसंख्य मतांनी निवडून आणू असा संकल्प केला आहे.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा महाराष्ट्र मच्छीमार धोरण समितीचे सदस्य बंडूभाऊ हजारे,भोई समाजाचे युवा नेते महाराष्ट्र मच्छीमार धोरण समितीचे सदस्य एड. अमोल बावणे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्याताई गुरनुले, भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदूभाऊ रणदिवे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुल तालुका अध्यक्ष मंगेश पोटवार, भाजपा शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर,मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष विजय कस्तुरे, कोल्हे, गिरीधर मेश्राम मूल मच्छिमार संस्थेचे अध्यक्ष जितू टिंगूसले व मुल, पोभुर्णा, बल्लारपूर तालुक्यातील बहुसंख्य भोई बांधव आणि मच्छिमार संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सुधीरभाऊंनी आमच्या समाजाच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नाचे ऋण फेडण्याची आता हिच योग्य वेळ आहे.
आनंदराव गोहने
सचिव मच्छीपालन सहकारी संस्था टेकाडी