गोंडपिपरी – (सुरज माडूरवार)
गोंडपिपरी पोलिसांनी मंगळवारी सकाळी पाच वाजता दरम्यान भंगाराम तळोधी मार्गावर कारवाई करत महाराष्ट्रातून तेलंगणा राज्यात अवैधरीत्या जनावरांची तस्करी करणाऱ्या तीन ट्रक जप्त करून एकूण १०० जनावरांची सुटका केली.याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून ४२ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त करन्यात आला.दोन चालक पळून जाण्यात यशस्वी ठरले. एक आरोपी ताब्यात सापडला असून मुसाब अली खान गडचांदूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.गोंडपिपरी पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर छत्रपती शिवाजी चौकात ठाणेदार रमेश हत्तिगोटे यांनी पोलीस सहकारी कोसनशिले,मनोहर मत्ते,गणेश पोदाळी,प्रशांत नेताम,सचिन मोहुरले, कुडमेथें या सहकाऱ्यांसह सापळा रचला तस्करांना कारवाई होणार असल्याचे संकेत मिळताच त्यांनी आड मार्ग निवडत गोंडपिपरी मार्गे न येता विठ्लवाडा मार्गे भंगाराम तळोधी कडे ट्रक वळविले पोलिसांनी माहिती मिळताच सिनेस्टाईल पाठलाग करून ट्रक क्रमांक MH 32 B 9584,MH 40BL 7186,MH 34 BG 8824 वाहन थांबवून तपासणी केली असता १०० जनावरे आढळून आले.जनावरे दाटीवाटीने वाहनात कोंबून निर्दयीपणे वाहतूक केली जात होती. याप्रकरणी आरोपी विरोधात पोलिसांनी महाराष्ट्र पशु संरक्षण, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमानुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार हत्तीगोटे यांनी गोंडपिपरी पोलीस स्टेशनचे सूत्रे हाती घेतल्यापासून गेल्या सहा महिन्यात चार मोठ्या कारवाया करत यापूर्वी 150 जनावरांची सुटका केली हे विशेष