गोंडपिपरी – (सुरज माडूरवार) :- गडचिरोली जिल्ह्यातील सूरजागड लोह खनिज प्रकल्पातून कच्चा मालाची दिवस रात्र वाहतूक सुरू आहे. त्यामुळे गोंडपिपरी मार्गावर अनेक अपघात घडत असल्याने अनेकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे विविध मागण्या घेवून गोंडपिपरीं तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे तालुका अध्यक्ष, कार्यकर्ते,विविध सामाजिक संघटनेचे यासह व्यापारी संघटनेच्या पदाधिकारी यांच्या पुढाकाराने सुरजागड वाहतूक विरोधात दि .१४ जून रोज शुक्रवार रास्ता रोको आंदोलन करण्याबाबत शिवसेना उबाठा चे जिल्हा उपप्रमुख संदीप करपे ,शिवसेना तालुका प्रमुख सूरज माडुरवार,भाजप तालुका अध्यक्ष बबन निकोडे,काँग्रेस तालुका अध्यक्ष तुकाराम झाडे,काँग्रेस शहर अध्यक्ष राजू झाडे,नगरसेवक सुनील संकुलवार पंकज डांगी,अशपाक कुरेर्शी, शैलेश बैस,तुकाराम सातपुते, नितीन धानोरकर,भाजपचे शहर अध्यक्ष तथा न.प नगरसेवक चेतनसिंह गौर , राकेश पून ,साईनाथ मास्टे, निलेश पुलगमकर, भाजपा महीला तालुका अध्यक्ष सुरेखा श्रीकोंडावार,संजय झाडे यांनी गोंडपिपरीचे उपविभागीय दंडाधिकारी स्नेहल रहाटे यांना निवेदन देण्यात आले होते .त्याच पार्श्वभूमीवर बैठकाही सातत्याने होत असून एका मोठ्या जण आंदोलनाची तयारी सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून नियोजन सुरू आहे अशातच आज दिनांक 3 सोमवारी दुपारी 12 वाजाताचे दरम्यान संदिप करपे हे आपल्या दुकानासमोर उभे असताना एका टू व्हीलर वरून आलेल्या इसमाने गाडीवरून – अगर सुरजा गड कंपनी विरोधी आंदोलन किया तो एक्सीडेंट करके उडा देंगे! अशी धमकी देऊन पसार झाले.यामुळे आंदोलन एक नवीन वळणावर पोहचले आहे.
घटनेची तक्रार पोलिस स्टेशन गोंडपिपरी येथे दिलेली असून भारतीय दंड संहिता 1860 धारा 506 अंतर्गत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार रमेश हत्तीगोटे करीत आहेत