गोंडपिपरी –
लोकसभा निवडणुकीचा निकाल दि.(४) मंगळवारी जाहीर होणार आहे.निकालाच्या पार्श्वभूमीवर विजयाचे दावे प्रतिदावे सुरू आहे.सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सर्व पक्षीय कार्यकर्ते सक्रिय दिसत आहे.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या अनुषंगाने गोंडपिपरी पोलीस स्टेशन मधे सर्व पक्षीय प्रमुखांची बैठक पार पडली.यावेळी निकाल लागल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षांमध्ये द्वेषभावना निर्माण होईल किंव्हा जातीय ,धार्मिक,राजकीय भावना दुखावतील असे कोणतेही कृत्य नारे चीथावणीपूर्ण भाषण देऊ नये तेढ निर्माण होईल असे सोशल मीडिया वर मॅसेज टाकू नये निकालाचा विजयोत्सव साजरा करताना सार्वजनिक अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.विजयाचे बॅनर लावताना प्रशासनाची अधिकृत परवानगी घ्यावी अशा सूचना ठाणेदार रमेश हत्तिगोटे यांनी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना देण्यात याले.यावेळी भाजप तालुका अध्यक्ष बबन नीकोडे,शिवसेना तालुका अध्यक्ष सुरज माडूरवार,काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष निलेश संगमवार,भाजप शहर अध्यक्ष चेतन गौर,शहर अध्यक्ष राजू झाडे,काँग्रेसचे नगरसेवक सुनील संकुलवार,युवासेना तालुका प्रमुख तुकाराम सातपुते,नागेश इटेकर,माया वाघाडे यांची उपस्थिती होती