गोंडपिपरी –
गोंडपिपरी तालुका अंतर्गत येणाऱ्या खराळपेठ येथील पाणीपुरवठ्याची पाईपलाईन जलजीवन मिशन योजनेचे काम करताना कंत्राटदाराने फोडल्याने गेल्या चार महिन्यापासून येथील पाणीपुरवठा बंद आहे. कंत्राटदाराच्या चुकीमुळे गावातील महिलांना ४८ डिग्री तापमान असताना जीव धोक्यात टाकून पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने संताप व्यक्त केल्या जात आहे.
वढोली येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत खराळपेठ येथे पाणीपुरवठा केला जातो परंतु गावात जलजिवण मिशन योजने अंतर्गत नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू होते पाइपलाइन टाकताना कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे गावात पाणीपुरवठा होणारी पाइपलाइन फुटली व अजूनही दूरस्त न केल्याने चार महिन्यापासून पाणीपुरवठा खंडित झाला आहे. यंदा अनेक वर्षांचा रेकॉर्ड तापमानाने मोडला अशावेळी उष्मघाताने मोठ्या प्रमाणात राज्यात अनेकांना जीव गमवावा लागला.पाणीपुरवठा बंद असल्याने तप्त उन्हात महिलांना गावात पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे त्यामुळे उष्माघाताने कुणाचा जीवही जाण्याची शक्यता आहे . नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत कमी असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी भर उन्हात वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे तात्काळ गावातील पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करावा अन्यथा चार दिवसात पंचायत समितीवर घागर मोर्चा धडकणार असल्याची माहिती गावातील नागरिकांनी दिली.
चार महिन्यांपासून गावातील पाणी पुरवठा बंद आहे.सद्या तापमानाचे प्रमाण खूप आहे अनेकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम दिसत आहे.प्रशासनाने तातडीने उपयोजना करून पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करावा.
-अभय शेंडे ,सदस्य ग्रामपंचायत खराळपेठ