सीईओ साहेब हे चाललय
गोंडपिंपरी –
जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या गोंडपिपरी तालुक्याचे सद्या तीन तेरा वाजले आहे.
गोंडपिपरी पंचायत समितीच्या उदासीन धोरणामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहे.
गोंडपिपरी पंचायत समितीमध्ये संवर्ग विकास अधिकारी म्हणून शालिक माऊलीकर हे मागील दहा महिन्या आधी निवृत्त झाले
ते निवृत्त झाल्याने नियमित अधिकारी गेल्याने गोंडपिपरी पंचायत समितीचा कार्यभार हा प्रभाऱ्यांच्या भरोशावर सुरू होता त्यामुळे तालुक्यातील जनतेला अनेक त्रासाला पुढे जावे लागत होते तसेच विकास कामाचाही खोळंबा झालेला निदर्शनास येत होता.अखेर महाराष्ट्र शासनाने अनेक संवर्ग विकास अधिकाऱ्यांच्या पदावर अनेक अधिकाऱ्यांना बढत्या दिल्या
शासन परीपत्रकानुसर. महाराष्ट्र विकास सेवा गट -अ मध्ये अतिरिक्त गटविकास अधिकारी या संवर्गातील अधिकाऱ्याचा समावेश होतो तसेच महाराष्ट्र विकास सेवा गट- ब मध्ये सहाय्यक गटविकास अधिकारी या संवर्गाच्या अधिकाऱ्याचा समावेश होतो त्यामुळे गोंडपिपरी पंचायत समितीमध्ये दुसऱ्या दर्जाचा अधिकारी नसल्यामुळे येथील प्रभार हा नेहमीच बाहेरील सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांकडे राहिला होता.महाराष्ट्रात अनेक अधिकाऱ्यांना बढती दिली त्यात चंद्रपूर जिल्ह्याला सात सहाय्यक गटविकास अधिकारी नव्याने रुजू झाले आणि त्यातील एक गोंडपिपरी येथे स्थायी गटविकास अधिकारी मिळाला. माऊलीकर यांच्या नंतर प्रभाऱ्यांच्या भरोशावर चाललेल्या पंचायत समितीचा डोलारा सुरळीत चालेल अशी आशा गोंडपिपरी वासियांची पल्लवीत झाली होती. संवर्ग विकास अधिकाऱ्याचे सूत्र पुप्पलवार यांच्या कडे देण्यात आले.परंतु काही दिवसातच समकक्ष अधिकारी असताना सुधा गोंडपिंपरीच्या पंचायत समितीचा कार्यभार हा मूल येथील अरुण चनफने सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे गोंडपिपरी पंचायत समिती मधील विकास कामाचा खोळंबा होत आहे तर अनेक नागरिकांची पायपीट होत आहे.स्थाई अधिकारी असताना त्यांना डावळून बाहेरील मर्जीतील अधिकाऱ्याला प्रभार दिल्याने आर्थिक देवाणघेवाण झाली का असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे.
सध्या निवडणुकीचा काळ असल्याने जिल्ह्यातील स्थानिक नेते हे निवडणुकीत व्यस्त असल्याने चाललेल्या अजब कारभाराकडे दुर्लक्ष झालेले होते. परंतु निवडणुका आता संपले असल्याने जिल्हा परिषदेच्या अजब कारभाराकडे लक्ष देऊन लोकहित जपले पाहिजे अशी मागणी सुज्ञ नागरिकाकडून केली जात आहे.
गोंडपिपरीत समकक्ष अधिकारी असताना मुलच्या अधिकाऱ्याकडे बीडिओचा प्रभार देण्यात आला हे अत्यंत चुकीचे आहे, सर्वसामान्य नागरिकांचे अनेक कामे खोळबत आहेत.पुप्पलवार यांच्याकडे कायमस्वरूपी प्रभार देण्यात यावा.मुलचे अधिकारी चनफने यांचा गोंडपिपरीचा प्रभार तात्काळ काढण्यात यावा.अन्यथा सात दिवसानंतर तीव्र आंदोलन पंचायत समिती समोर करण्यात येईल.
– सुरज माडूरवार
– शिवसेना तालुकाप्रमुख गोंडपिपरी