गोंडपिपरी – (सूरज माडूरवार)
सुरजागड येथे लोहखनिज आणन्याकरीता हायवा मोठ्या प्रमाणात जात असते दिवस रात्र वाहनांची वर्दळ असते.कंपनीची स्वतंत्र पार्किंग व्यवस्था असताना सुधा अनेक वाहने गोंडपिपरी शहरात राष्ट्रीय महामार्गावर अनाधिकृत पार्किंग केली असते.अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता या वाहणांविरोधात गोंडपिपरी पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरू केली आहे.
सुरजागड जाण्याकरिता शहरातून हायवा जात असतात.यांना कुठलीही शिस्त राहिली नाही.अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे अनेकांना जीव गमवावा लागला अनेकांना अपंगत्व आले.वाढत्या अपघाताची गंभीर दखल घेत ठाणेदार रमेश हत्तीगोटे,पिएसआय मरापे,कराडे यांच्या मार्गदर्शनात मनोहर मत्ते,गणेश पोदाळी ॲक्शन मोड मधे येत दि.२९ मंगळवारी एका दिवसात नो पार्किंग मधे असणाऱ्या ४० हायवांवर कलम १२२ मोटार वाहन कायद्याअंतर्गत एकून वीस हजार रुपये दंड आकारण्यात आला.सदर कारवाई रोज सुरू राहणार असल्याचे ठाणेदार हत्तीगोटे यांनी सांगितले.