गोंडपिंपरी (सूरज माडूरवार) –
नियमावलीकडे दुर्लक्ष करून होर्डींग लावल्याने मुंबईतील घाटकोपर येथील दुर्घटनेत १४ नागरिकांचा नाहक बळी गेल्याची घटना (१४) मंगळवारी घडली.
घटना घडताच राज्यभर प्रशासन अलर्ट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
अशातच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या अहेरी आगारांतर्गत येत असलेल्या गोंडपिपरी बस स्थानक परिसरातील फ्लेक्स धोकादायक ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे . जाहिरातीच्या प्रसिद्धीसाठी राज्य महामंडळ प्रशासनातर्फे बस स्थानक परिसरात चहा ,नाश्ता कॅन्टीनच्या वर अनेक वर्षापासून बॅनर फ्लेक्स लावले आहे. त्या फ्लेक्स च्या माध्यमातून अनेक जाहिराती त्या ठिकाणी लागत होत्या परंतु गेल्या दोन वर्षापासून ती फ्लेक्स जुनी झाल्यामुळे काही पत्रे उडून गेले तर काही पत्रे शिल्लक आहेत. फ्लेक्सच्या खाली विद्यार्थी बसची वाट पाहत असल्याने मोठा अपघात घडण्याची वाट प्रशासन पाहत आहे का …? प्रशासनाला जाग केव्हा येईल असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे.
बस स्थानक परिसरातील फ्लेक्स केव्हाही कोसळू शकते बऱ्याच वर्षापासून ते फ्लेक्स त्या ठिकाणी आहे .अर्धवट तुटलेले फ्लेक्स असल्याने एखाद्या विद्यार्थ्यांचा परिवहन मंडळ कर्मचाऱ्यांचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे तात्काळ प्रशासनाने ते फ्लेक्स काढावे
– विवेक राणा शहर प्रमुख शिवसेना (उबाठा) गोंडपिपरी