चिमूर प्रतिनिधी
चिमूर तालुक्यातील शिवरा या गावातील मजूर राष्ट्रपाल खडसंग वय 39 हा तेंदू पत्ता तोडायला लावारी जंगलात गेला असता दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला करून जखमी केले. ही घटना मंगळवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 11 वाजता घडली.
राष्ट्रपाल हा गावातील आपल्या सहकाऱ्यांसोबत सकाळीच तेंदुपत्ता तोडायला वनविकास महामंडळ खडसंगी अंतर्गत शंकरपूर पासून पाच किमी अंतरावर असलेल्या लावारी कक्ष क्रमांक 17, या जंगलामध्ये गेला होता. तेंदुपत्ता तोडत असताना दाट झुडपामध्ये लपून बसलेल्या पट्टेदार वाघाने राष्ट्रपालवर झडप घेऊन हमला केला. परंतु यात तो बचावला. व घाबरून जाऊन तो झाडावर चढायला लागला असता वाघाने त्याच्या पाठीवर पंजा मारून त्याला गंभीर जखमी केले. ही बाब त्याच्या सहकाऱ्यांच्या लक्षात येतात त्यांनी जोराने ओरड केली असता वाघ तिथून पडून गेला. त्यामुळे राष्ट्रपाल याचा जीव थोडक्यात वाचला. सहकाऱ्यांनी जखमी राष्ट्रपाल ला शंकरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचाराकरता आणले. व याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली. जंगलामध्ये वाघांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून परिसरात वाघाच्या हल्ल्याच्या बऱ्याच घटना घडत आहेत. या घटनेमुळे तेंदु पत्ता मजुरांमध्ये व परिसरातील गावांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.