७२ हजारांचा सुंगांधित तंबाखू
गोंडपिपरी – (सुरज माडूरवार)
राज्यात गुटख्याबरोबर सुगंधित तंबाखू विक्रीवर बंदी आहे.असे असताना मात्र तेलंगणा सीमेवरील गोंडपिपरी तालुक्यात सुगंधित तंबाखूची विक्री दिवसाढवळ्या सुरू आहे.अनेक अवैध धंदे तालुक्यात फोफावले आहे.अशातच अवैध धंद्यांविरोधात ठाणेदार रमेश हत्तिगोटे यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
तालुक्यातील भंगारपेठ येथे गोंडपिंपरी पोलिसांनी धाड टाकून ७२ हजारांचा सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला.या प्रकरणात तीन आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला.एका आरोपीला अटक करण्यात आली.दि.१४ मंगळवारी सकाळी नऊ वाजता दरम्यान गुप्त माहितीच्या आधारावर भंगारपेठ येथे दोन ठिकाणी एकाच वेळी धाड टाकण्यात आली.दोन्ही ठिकाणी एकूण ७२ हजारांचा तंबाखूचा साठा जप्त करत.विनोद आनंदराव पोटे वय ३५,अरुण काशिनाथ राजकोंडावार वय ४५ दोघेही रा.भंगारपेठ,आशिष श्रिकोंडावार रा. मुल अशा दोन्ही प्रकरणातील आरोपींचे नावे आहे.
काशिनाथ राजकोंडावार याला अटक करण्यात आली.धडक कारवाईमुळे तस्करांचे धाबे दणाणले आहे.सदर कारवाई ठाणेदार रमेश हत्तिगोटे, पिएसआय कराडे,मनोहर मत्ते,प्रशांत नैताम,पवार यांनी केली.
सुगंधित तंबाखू तस्करीचे मुल कनेक्शन ..
भंगारपेठ येथील कारवाई दरम्यान अटकेतील आरोपीने सदर तंबाखू साठा मुल येथील आशिष श्रिकोंडावार यांनी घरी ठेवला असल्याची माहिती दिली.त्यामुळे हा साठा तालुक्यात पुरवठा केल्या जातो की तेलंगणा राज्यात याचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान असून मूल येथील आरोपीला तंबाखू साठा कुठून पुरवठा होतो हा संशोधनाचा विषय आहे.मोठे आरोपी यात अडकण्याची शक्यता आहे.