अहेरी:-तालुक्यातील एस बी कॉलेज समोर असलेल्या जंगलात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.ही घटना आज पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे.
आज सोमवार रोजी पहाटेच्या सुमारास वॉकिंग ला जाणाऱ्यांना लोकांना मृतदेह दिसून आला.त्यानंतर पोलिसांना माहिती मिळताच अहेरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.नेमकं सदर इसम कोण आहे याची माहिती कळू शकली नाही.मात्र,घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच लोकांनी एकच गर्दी केली आहे.
अहेरी पोलिसांना याबाबत विचारले असता घटनास्थळी पोलिसांना पाठविले असून मोका पंचनामा झाल्यावर अद्यावत माहिती देणार असे सांगितले.