चंद्रपूर : चंद्रपूर- वणी-आर्णीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य तसेच मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे हात बळकट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सोमवार (दि. ८ एप्रिल २०२४) चंद्रपूर येथे येणार आहेत. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाचे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना आशीर्वाद देण्यासाठी पंतप्रधान . नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे.
चंद्रपूर येथील मोरवा विमानतळाजवळील भव्य पटांगणावर ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधानांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी ४ वाजता ही सभा होईल. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघामध्ये ना. सुधीर मुनगंटीवार यांचा जनसंपर्काचा धडाका सुरू आहे. विकास कामे आणि चंद्रपूरच्या विविध घटकांच्या प्रगतीच्या दृष्टीने विविध प्रकल्प राबविण्यात आल्यामुळे विशाल जनमत सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठिशी आहे. अशात देशातील गोरगरीब, शेतकरी, मजूर, महिला व तरुणांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून ‘मोदी की गॅरंटी’ देणारे पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन होत असल्याने जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे. या सभेची जय्यत तयारी सुरू असून सर्वसामान्य जनतेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
*पंतप्रधानांच्या ‘व्हिजन’वर ना. मुनगंटीवार यांची वाटचाल*
भारताचे लाडके पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या सक्षम नेतृत्वात भारताचे ‘प्रगती दशक’ संपूर्ण भारतीय अनुभवत आहेत. या दहा वर्षात कृषी, विज्ञान, अंतराळ, शिक्षण, आरोग्य, सुविधा अशा प्रत्येकच क्षेत्रात देशाने आघाडी घेतली. अनेकविध योजनांच्या माध्यमातून तळागाळातील सामान्य नागरिक, महिला आणि इतर गोरगरिबांचा जीवनस्तर उंचावण्याचा प्रयत्न मोदी सरकारने यशस्वीपणे केला. हाच धागा पकडत ना. मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राची प्रगती साधताना एक नवा आदर्श भारतीयांपुढे निर्माण केला. विशेष म्हणजे मा. नरेंद्रजी मोदी यांनी यापूर्वी ना. मुनगंटीवार यांच्या कार्याची जाहीरपणे प्रशंसा केलेली आहे. यात २ कोटी वृक्ष लागवड, चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी मिशन शोर्य अंतर्गत केलेल्या कामगिरीबद्दल मन की बात मध्ये कौतुक,ताडोबा अंधारीमध्ये आभासी भिंतीचा प्रयोग, ‘मन की बात’ या कार्यक्रमात मोदीजींनी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी केलेल्या प्रयोगाचे सुद्धा कौतुक केले आहे.
*चंद्रपूरच्या विकासात पंतप्रधानांचे योगदान*
ना. श्री. मुनगंटीवार यांनी गेल्या 10 वर्षांत चंद्रपूर लोकसभेत मोदी सरकार आणि राज्यातील भाजप सरकारच्या पाठिंब्याने अभूतपूर्व कामगिरी केली आहे. त्यामुळे हा प्रदेश विकासाच्या नव्या मार्गावर मार्गक्रमण करू लागला आहे. बल्लारपुर ते तेलंगाना राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होत आले आहे. केंद्र सरकारने चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या चामोर्शी गावात सूरजागड लोहखनिज प्रकल्प सुरू केला आहे. चंद्रपुर आणि गडचिरोली जिल्यातील लोकांची मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने आष्टी गावाजवळ वैनगंगा नदीवर पूल बांधला आहे. यासोबतच केंद्र सरकारने खुप वर्षापासून मागणी असलेल्या राष्ट्रीय महामार्ग आणि वर्धा नदीवरील पुलाचे काम देखील पूर्ण केले आहे. माणिकगड रेल्वे स्थानक आणि भद्रावती तालुक्यातील नंदुरी रेल्वे स्थानकाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. यासोबतच वरोरा तालुक्यातील नागरी आणि चिकनी रेल्वे स्थानकांचे उद्घाटन आणि चंद्रपूर येथील ओव्हर ब्रिजचे भूमिपूजन देखील प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते झाले. प्रधानमंत्री कृषि सम्मान निधि योजनेअंतर्गत चंद्रपुर जिल्ह्यातील 2,55,536 शेतकर्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 1,25,355 महिलांना मोफत गॅस वितरित करण्यात आले आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 42,744 शेतकर्याना विमा देण्यात आला आहेत. यासह अनेक विकासकामे पंतप्रधानांच्या सहकार्यामुळेच चंद्रपुरात होऊ शकली आहेत.
*पक्षाचा विश्वास सार्थ ठरवेन*
आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यास कटिबद्ध आहे. जनताही यात सहकार्य करीत आहे. विकासकामांमुळे नागरिकांच्या जीवनात झालेले सकारात्मक बदल निवडणुकीत नक्कीच साथ देईल. या प्रवासात देशगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी मला आशीर्वाद देण्यासाठी येत असल्याने मला अतीव आनंद होत आहे.अशा भावना ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या आहे.