शंकरपूर प्रतिनिधी:- शंकरपूर पासून पाच किमी अंतरावरील आजगाव शेतशिवारात वाघाने दोन शेतकऱ्यांच्या दोन गाईवर हल्ला करून जागीच ठार केले त्यामुळे आजगाव पाचगाव चिचाळा कुणबी कोलारी साठगाव येथील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .त्यामुळे या वाघाचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी वनविभागाला केली आहे
आजगाव येथील उमेश ज्ञानेश्वर देशकर व नारायण घार यांनी आपल्या गाई बोरीच्या झाडाखाली बांधल्या होत्या नारायण घ्यार यांची गाय सात महिन्यांची गरोदर होती जंगल्या परिसरापासून दहा ते बारा किमी दूर असल्याने परिसरात वाघ असल्याची कल्पनाही या शेतकऱ्यांना नव्हती परंतु काल पहाटे चार वाजताच्या सुमारास वाघाने या दोन्ही गाईवर हल्ला करून दोन्ही गायी ठार केल्या
याची माहिती मिळताच चिचाळा कुणबी येथील ग्रामपंचायत सदस्य गौतम धनविजय व त्यांचे सहकारी राकेश धनविजय निलेश धनविजय व संदेश वाघमारे हे घटनास्थळी पोहोचून शंकरपूर वनविभागाला याबाबत कळविण्यात आले वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल होऊन मृत गाईच्या पंचनामा करण्यात आला यात दोन्ही शेतकऱ्यांचे हजारो रुपयाचे नुकसान झाले असून हे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत यांना त्वरित नुसकान भरपाई देण्यात यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी वन विभागाला केली आहे
परिसरात कापूस वेचणी मिरची तोडणी तुर चना लाख जवस इत्यादी मालाची कापणी व इतर शेतीची कामे सुरू असून या घटनेने शेतकरी तसेच शेतमजूर वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे वनविभागाने वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी वन विभागाला केली आहे
घटना घडलेल्या परिसरात वनविभागाने ठीक ठिकाणी कॅमेरे बसविले असून परिसरात गस्त सुरू केली आहे लवकरच या वाघाला या परिसरातून जंगलात हाकलण्यात येईल अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी श्री लोखंडे यांनी दिली आहे.