गोंडपिपरी -(सुरज माडूरवार)
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंडपिपरी पोलीस अलर्ट मोडवर आहेत. आचारसंहिता लागल्यापासून अवैद्य धंदे रोखण्यासाठी गडचिरोली – चंद्रपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या आष्टी सीमेवरती नाकाबंदी लावण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर गोंडपिपरी तालुका हा तेलंगणा राज्याला लागून असल्याने तेलंगणा राज्याच्या सीमेवरती देखील येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे .अवैद्य दारू वाहतूक करणाऱ्यांवर देखील कारवाईचा बडगा उभारला जात आहे.
गोंडपिपरी तालुका हा तेलंगणा सीमेवरील असून गोंडपिंपरी सीमा ही गडचिरोली जिल्ह्याला लागून आहे वैनगंगा आष्टी नदीपलीकडे गडचिरोली जिल्हा असून जिल्ह्यात दारू बंदी असल्याने छुप्या मार्गाने चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली दारू तस्करी मोठ्या प्रमाणात होत असते.नोटा,दारू आदींचा पुरवठा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नदीकाठी टेंट टाकून कडक पहारा दिला जात आहे. शिवाय एसटी महामंडळाच्या बस आणि खाजगी वाहनांची तपासणी देखील केली जात आहे.गोंडपिपरीचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात आहे .पोलिसांचे कामकाज पाहण्यासाठी रोज ठाणेदार हत्तीगोटे सीमेवरती भेट देत आहे.