चंद्रपूर:विद्यार्थ्यांमध्ये अंतराळविषयक ज्ञानात भर पडावी, विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, यासाठी बालवयापासून जिज्ञासू वृत्ती जोपासावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, महाराष्ट्र संचालक तथा माजी सभापती तसेच काँग्रेस नेते दिनेशभाऊ चोखारे यांनी केले
नवरत्न स्पर्धा तसेच विज्ञान प्रदर्शनात चमकणाऱ्या जिल्हा परिषद शाळांमधील 30 विद्यार्थ्यांची कर्नाटक राज्यातील बंगलुरु येथील इस्रो प्रकल्प पाहण्यासाठी निवड करण्यात आली होती. इस्रो दौऱ्यावरून परत आलेल्या बल्लारपूर तालुक्यातील विद्यार्थ्यांचे कौतुक करताना ते बोलत होते. यावेळी बल्लारपूर तालुक्यातील कवडजई येथील कु. ऋतुजा गोपीचंद पेंदोर आणि जुनी दहेली येथील सक्षम राजेंद्र गोंधळी या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष गोवींदा पाटील उपरे, ओबीसी नेते सचिन राजूरकर, सामाजिक कार्यकर्त्या नाजुका हनुमान आलाम याची उपस्थित होती.
जिल्हा परिषद शाळांमधील 30 विद्यार्थ्यांची इस्रो दौऱ्यासाठी निवड करण्यात आली होती. यात बल्लारपूर तालुक्यातील कवडजई येथील कर्मवीर विद्यालय, येनबोडी येथे वर्ग ८ विला शकत असलेली कु. ऋतुजा गोपीचंद पेंदोर आणि जुनी दहेली येथील श्री. बालाजी हायस्कुल बामणी दुधोली येथे वर्ग ९ वी मध्ये शिकत असलेला सक्षम राजेंद्र गोंधळी या दोघांचाही कौतुक व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
दोघांनीही आपल्या यशाचे श्रेय शिक्षकवृंद तसेच आई वडिलांना दिले आहे.