• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

सुधीरभाऊंसारखा धडाडीचा लोकनेता बघितला नाही : कृषीमंत्री धनंजय मुंडे

चांदा ॲग्रो 2024’ कृषी प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन

Ashish Ghume by Ashish Ghume
January 4, 2024
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
सुधीरभाऊंसारखा धडाडीचा लोकनेता बघितला नाही : कृषीमंत्री धनंजय मुंडे
Spread the Information

चंद्रपूर :-  सुधीरभाऊ मुनगंटीवार म्हणजे राजकीय आणि सामाजिक वर्तुळातील भारदस्त व्यक्तिमत्व. सुधीरभाऊ भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनीच मला भारतीय जनता युवा मोर्चाच्या राज्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्यांच्यामुळेच निवडणुक लढण्याची पहिली संधी मिळाली. ही संधी मिळाली नसती तर मी आज या पदापर्यंत पोहचू शकलो नसतो. सामान्य कार्यकर्त्यांना मोठ्या पदापर्यंत पोहोचवणारा, सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी सभागृहात लढणारा आणि धडाडीने कामे करणारा सुधीरभाऊंसारखा लोकनेता आजवर बघितला नाही, असे गौरवोद्गार राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी काढले.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

‘चांदा ॲग्रो 2024’ कृषी प्रदर्शनाचे बुधवारी थाटात उद्घाटन झाले. यावेळी ना.  मुंडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना.  मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, खादी ग्रामोद्योग मंडळाचे प्रमुख रवींद्र साठे, डॉ. विनिता व्यास, जितेंद्र रामगावकर, बांबू बोर्डाचे श्रीनिवास राव, शंकरराव तोटावार, प्रीती हिरलकर, हरीश शर्मा, देवराव भोंगळे, राहुल पावडे, राजीव कक्कड, ब्रीजभूषण पाझारे, अनिल डोंगरे, नरेंद्र जीवतोडे, अंजली घोटेकर, रामपाल सिंग, नामदेवराव डाहुले, तुषार सोम, प्रकाश धारणे यावेळी उपस्थित होते.

ना. मुंडे म्हणाले, ‘सुधीरभाऊंनी कृषी महोत्सवाचा उद‌्घाटक म्हणून बोलावले, याचा मला कमालीचा आनंद आहे. कारण राज्याच्या कृषीमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून माझ्या हस्ते प्रथमच एखाद्या कृषी महोत्सवाचे उद्घाटन होत आहे.’ राज्याच्या मंत्रिमंडळातही सुधीरभाऊंचे प्रचंड वजन असल्याचे ते म्हणाले. बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक असते. पण सुधीरभाऊं म्हणाले होते, ‘काळजी करू नकोस’. आणि बघा आजची कॅबिनेट बैठक झालीच नाही. बैठक असती तर मी इथे हजरच राहू शकलो नसतो, असेही ना. मुंडे म्हणाले. राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात सुधीरभाऊंच्या बाजूला बसण्याचा योग येऊ शकतो, याचा आपण कधी विचारही केला नव्हता, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

चंद्रपूरकडे प्रवास करीत असताना सहज मी पूर्व आयुष्याचे सिंहावलोकन करीत होतो. अशात माझ्या आयुष्यातील खरे संकटमोचक म्हणून सुधीरभाऊच डोळ्यापुढे आले. सुधीरभाऊंशी माझे आगळेवेगळे नाते आहे. ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी माझ्यावर विश्वासाने सोपवली, या शब्दांत ना. मुंडे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

ना. श्री. सुधीर मुनगंटीवार हे शिवभक्त आहेत. आपण शिवाचे भक्त आहोत. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी वैजनाथ येथून आपण असल्याचा अभिमान वाटतो, असेही ना. मुंडे यांनी नमूद केले.

क्रांतीज्योतींच्या जयंतीचा योगायोग
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची बुधवारी जयंती होती. यासंदर्भात बोलताना कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, ‘पुणे विद्यापीठाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यासाठी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेला लढा महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे. कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या दिवशी सावित्रीबाईंच्या जयंतीचा योगायोग जुळून येणे आनंददायी आहे.’

दांडगा पाठपुरावा
एखाद्या कामासाठी सुधीरभाऊ दांडगा पाठपुरावा करतात. सरकारमध्ये असो की विरोधी पक्षामध्ये सुधीरभाऊ अनेक स्मरणपत्रे पाठवितात. त्यामुळे मंत्र्यांवरही एक प्रकारचा सकारात्मक दबाव निर्माण होतो, असा उल्लेख मुंडे यांनी केला.

अशी केली परतफेड

राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे अर्थ मंत्री असताना त्यांनी चंद्रपूरसाठी निधी दिला होता. सुधीरभाऊंनी अर्थमंत्री असताना त्यांनी तटकरे यांच्या मतदार संघात भरीव निधी देत त्याची परतफेड केली, असे आगळेवेगळे विकासाचे राजकारण करणारे सुधीरभाऊ हे माझ्या पाहण्यातील एकमेव राजकीय नेते आहेत, असेही ना. श्री. मुंडे म्हणाले.

Previous Post

आव्हान शिबिरातून साहसी विद्यार्थी तयार होऊन त्याचा उपयोग समाजासाठी होईल -विजय वडेट्टीवार

Next Post

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1