बाजारसमिती ठरत आहे भाजप प्रचाराचे केंद्र:काँग्रेसचा आरोप
गोंडपिपरी -(सुरज माडूरवार)
गोंडपिपरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपची सत्ता आहे.बाजार समितीच्या स्थापनेनंतर येथे पहिल्यांदाच भाजपने गड जिंकला.अशात सध्या गोंडपिपरीच्या बाजार समितीचे राजकारण चांगलेच पेटले आहे.त्याला कारणीभूत ठरली ती बाजार समितीने काढलेली नवीन वर्षाची दिनदर्शीका.दिनदर्शिका प्रसिध्द होताच विरोधक असलेल्या काॅग्रेसने यावर आक्षेप घेतला.हि दिनदर्शिका आहे कि भाजपचे प्रसाराचे माध्यम असा सवाल करित काॅग्रेसच्या संचालकाने बाजार समिती आवारात आज दि (२) मंगळवारी दिनदर्शीकेची होळी करून .यासंदर्भात काॅग्रेसच्या संचालकाने प्रशासनाला निवेदन दिले आहे.
गोंडपिपरीच्या बाजार समितीवर पहिल्यांदाच भाजपची सत्ता आली.बाजार समितीवर आपलीच सत्ता येईल असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांना शेवटपर्यत होता.पण त्यांचे केवळ सहाच उमेदवार निवडून आले.अजूनही काॅग्रेस हा पराभव सहन करू शकली नाही.अशात गोंडपिपरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने नवीन वर्षाचे निमीत्त साधून दिनदर्शीका काढली.दिनदर्शीकेच्या प्रत्येक पानावर भाजपच्या नेत्याचे फेाटो छापण्यात आले आहेत.नेमकी हिच बाब काॅग्रेस कार्यकर्त्यांना खटकली आहे.दिनदर्शिकेत सभापती,उपसभापती यांचे फोटो आहेत.सोबतच भाजप व काॅग्रेस संचालकांची नावे देखिल टाकण्यात आली आहेत.पण आम्हाला न विचारता आमची नावे टाकण्यात आल्याचा आरोप काॅग्रेस संचालकांनी केला. जिल्हा उपनिबंधकाकडे बाजार समितीच्या सत्ताधा-याविरोधात तक्रार दाखल केली आहे.बाजार समिती हि शेतक-यांची आहे.शेतक-यांच्या कष्टाच्या पैशावर बाजार समिती भाजपचा प्रसार करित असल्याचा आरोप त्यांनी केला.एकीकडे भाजपच्या नेत्यांचे फोटो दिनदर्शीकेवर छापण्यात आले तर दुसरीकडे स्थानिक काॅग्रेस आमदाराचा फोटो यातून हेतूपुरस्पर कापण्यात आल्याचे संचालकांचे म्हणणे आहे.दिनदर्शीका प्रसिध्द करतांना राजशिष्टाचार पाळण्यात आला नाही यापुर्वीही बाजार समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी आरोग्य शिबीर आयोजीत करून भाजपचा प्रचार करण्याचा पराक्रम केला आहे.बाजार समितीच्या माध्यमातून चाललेल्या पक्षप्रचाराच्या भुमिकेविरोधात आक्रमक झाले बाजार समितीत दिनदर्शीकेची होळी केली.
यावेळी बाजारसमीती संचालक देविदास सातपुते,अशोक रेचंनकर,प्रेमिला चनेकर,नारायण वागदरकर,संतोष बंडावार ,निलेश संगमवार या संचालकांसह काँग्रेस शहर अध्यक्ष राजू झाडे,तालुका उपाध्यक्ष नीतेश मेश्राम,तूकेश वाणोडे,गौतम झाडे,सारनाथ बक्षी,विनोद नागपुरे,अनिल झाडे,आशिष नीमगडे,सरपंच राजू राऊत,प्रा शंभू येलेकर,साईनाथ कोडापे यांच्यासह शेकडो शेतकरी व काँग्रेस समर्थकांची उपस्थिती होती.
यासंदर्भात बाजार समितीचे सभापती इंद्रपाल धुडसे यांची प्रतिक्रीया घेतली असता रितसर ठराव घेउनच दिनदर्शीका छापली असल्याचे ते म्हणाले.
बाजार समिती ही शेतकऱ्यांची आहे पण भाजप समर्पित संचालक बाजारमितीतील सत्तेचा वापर भाजप च्या प्रचारासाठी करत आहे त्यामुळे निषेध करत दिनदर्शिकेेची होळी करत निषेध केला – देविदास सातपुते संचालक बाजार समिती गोंडपिपरी