गोंडपिपरीत :– नव्या फौजदारी कायद्यात हिट अँड रन प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद केल्याच्या निषेधार्थ देशभरातील ट्रक,टँकर सह व्यावसायिक वाहन चालकांकडून आंदोलन करण्यात येत आहे.त्याच पार्श्वभूमीवर दि.(२) मंगळवारी छत्रपती शिवाजी चौक येथे एक तास चक्का जाम करत वाहतूक अडवून धरली.केंद्र सरकारने नवीन मोटार वाहन कायदा पारित केला.यानुसार अपघातास जबाबदार ट्रकचालकास सात वर्षाची शिक्षा व सात लाख रुपये दंड देखील आकारला जाणार आहे.या कायद्याच्या विरोधात चक्काजाम करत केंद्ररसरकारचा निषेध करून तहसीलदार शुभम बहाकर यांना निवेदन देण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ता शंकर पाल,चालक साईनाथ कोहपरे,मोहन चुदरी,शैलेश गौरकर,एकनाथ चुदरी,माणिक मेश्राम, धीरज मडावी यांच्यासह शेकडो चालक मालक उपस्थित होते.