वरोरा (चंद्रपूर ):- वर्षीच्या शेती हंगामात कापसाचे उत्पादन घटल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कायम आहे . अशातच वरोरा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे .यामुळे विवंचनेत असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचे बैल सर्पदंशामुळे मृत्युमुखी पडले या शेतकऱ्यांना नवीन बैल घेण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे .एकूण ५ शेतकऱ्यांना ३५ हजाराची मदत बाजार समितीने केली आहे .
कृषी उत्पन्न बाजार समिती वारोराच्र सभापती राजेंद्र चिकटे व पदाधिकाऱ्यांनी १४ फेब्रुवारी रोज सोमवारला शेतकऱ्यांच्या दारी पोहचून ही आर्थिक मदत दिली व त्यांची आस्थेने विचारपूस केली . वरोरा तालुक्यातील वंधली येथील शेतकरी पुरुषोत्तम जनार्धन ताजणे, तुकाराम संभाजी जोगी (पवनी), विजय पुरुषोत्तम धोटे (उमरी),अंकुश सदाशिव पेटकर (चारगाव खुर्द ), वासुदेव कवडू माकोडे (महालगाव.बु) या शेतकऱ्यांच्या बैलांचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला . या शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती वरोराच्या वतीने त्यांच्या घरी जावून आर्थिक मदतीचे धनादेश वितरीत करण्यात आले.एकूण ५ शेतकऱ्यांना ३५ हजाराची आर्थिक मदत करण्यात आली . यावेळी बाजार समितीचे सभापती राजेंद्र चिकटे , उपसभापती देवानंद मोरे , बाजार समिती संचालक संजय घागी , योगेश खामनकर ,हरीश जाधव , बाजार समितीचे सचिव चंद्रसेन शिंदे सहा. सचिव सचिन डहाळकर, क.लिपिक श्रीकांत ताटेवार,वंधली येथील सरपंच प्रवीण भोयर , उपसरपंच अनिल ठावरी,ग्रामस्थ चांगदेव धोटे , पवनी येथील उपसरपंच प्रफुल आसुटकर , ग्रामपंचायत सदस्य गणेश गराटे,महालगाव बु येथील पोलीस पाटील मनीषा वांढरे,ग्रामस्थ रामदास माकोडे , नामदेव जांभुळे ,विठ्ठल जनार्धन बदकी, रवींद्र पायघन आदी उपस्थित होते .













