अहेरी :- तालुक्यातील अतिसंवेदनशील नक्षल ग्रस्त भाग असलेल्या तुमरकसा येथील मनीषा आत्राम ही नागपूर येथील एम्स रुग्णालयात मागील एक महिन्या पासून उपचार घेत आहे.
मनीषा चा भाऊ बाबुराव तलांडे यांनी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या प्रदेश अध्यक्ष प्रणय खुणे यांच्याशी दूरध्वनी द्वारे संपर्क साधून बाबुराव तलांडे यांनी आपल्या बहिणीच्या प्राकृतिबद्दल संपूर्ण परिस्तिथीची माहिती देत चिंता व्यक्त केली असता प्रणय खुणे यांनी क्षणांचा ही विचार न करता बाबुराव तलांडे यांच्या फोन पे वर आर्थिक मदत पाठविली व पुढे ही सुद्धा मदत लागत असल्यास आपण राष्ट्रीय मानवाधिकार संघटने मार्फत मदत करू असे बोलून हिम्मत दिली.
मनीषा आत्राम यांची परिस्थिती अतिशय हलाकीची असल्याने उपचार घेणे शक्य नसल्याने व नक्षल ग्रस्त भागात राहून दोन वेळच्या भाकरी करीता वन वन भटकंती करावी लागते अश्या परिस्थितीच्या वेळेस गरीबाला जर किडनी चा आजार होत असेल तर अश्या परिस्थितीत देवच मदत करतो म्हणत, प्रणय खुणे यांनां मनीषा आत्राम यांनी मनातून धन्यवाद देत ईश्वराकळे प्रार्थना केली.
यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघनेच्या पद्धधिकारी विदर्भ अध्यक्ष जावेद अली, ज्ञानेद्र बिस्वास, आसुटकर यांनी सुद्धा प्रणय खुणे यांचे अभिनंदन केले.