गोंडपिपरीत –
तालुक्यातील कुलथा रेतिघाट तस्करांनी पोखरून काढला असून रात्रभर पोकलेन च्या साहाय्याने रेती काढणे सुरू असताना अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष दिसत आहे. तस्करांनी एकच धुमाकूळ घातला असून अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने रेती तस्करी सुरू असल्याचे बोलले जात आहे.रेती तस्करांवर आळा घालण्यासाठी महसूल विभाग फिरके पथक करत असतात परंतु सध्या ते फिरके पथक कोमात असल्याचे दिसत आहे.सोबतच वनविभागाच्या हद्दीतून सुधा मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे दुसरीकडे या गोष्टीचा फायदा उचलून तस्कर जोमात दिसत आहेत.
गोंडपिपरी तालुक्यात उत्तम दर्जाचा रेती साठा असून नद्यांमधून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी करून दुसऱ्या राज्यात देखील रेतीची वाहतूक होताना दिसत आहे.रेती तस्कर खुलेआम रेतीची वाहतूक करताना आढळत असून मोठे माफिया तयार झाले आहे.घाटाशेजारी हजारो ब्रास रेती साठा रात्रभरात जमा होतो अचानक गायब होतो.पुन्हा आढवडा भरात रेतीचे ढिगारे जसेच्या तसे दिसत असतात.
अनेक माणसे घाटापासून ते गोंडपिपरी पर्यंत अधिकाऱ्यांवर नजर ठेवले असतात. कुलथा घाटाकडे सामान्य नागरिक शेताकडे जाताना आढळल्यास त्यांना घेराव घालून चौकशी करतात व सोडतात त्यामुळे सामान्य नागरिक भयभीत असून रात्रीच्या वाहतुकीमुळे घाटाशेजारील गावकऱ्यांची झोप मोड होत असून झोपी गेलेल्या स्थानिक अधिकाऱ्यांना जाग येईल का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केल्या जात आहे.