गोंडपिपरी :-शालेय अभ्यासक्रमात कुठल्याही विषयाची भिती बाळगू नये.याउलठ कठिण विषयाशीच मैत्री करावी,असे मत धिरज बक्षी यांनी व्यक्त केले.ते करंजी शाळेत पारितोषिक वितरण सोहळ्यात बोलत होते.केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व व्यवसाय प्रशिक्षण मंडळ या संस्थेमार्फत “मॅथ्स जिनियस ओलंपियाड” ही स्पर्धा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा करंजी येथे नुकतीच पार पडली.शनिवारी(दि.२) या स्पर्धेअंतर्गत विजेत्या विद्यार्थ्यांना पदक देऊन सन्मान करण्यात आले.
शालेय अभ्यासक्रमातील विषयांपैकी गणित हा महत्त्वपूर्ण आणि तर्कशास्त्रीय विषय.गणित चांगले असणाऱ्या मुलांची बुद्धिमत्ता ही तीव्र आणि चांगली असते हे शास्त्रीय दृष्टिकोनातून समोर आले.गणित विषयाचा सबंध थेट मेंदू विकासाशी येतो.अश्यातच मानवीय मेंदूची वाढ साधारणता १४ वर्षापर्यंत होते.या वयापर्यंतच्या मुलांची बौद्धिक प्रगती गणिताच्या विविध कृतीद्वारे होऊ शकते.गणितासारखा महत्त्वपूर्ण व बुद्धिवर्धक विषयाची आवड मुलांमध्ये निर्माण व्हावी,तसेच गणितांची भिती नष्ट होऊन तो एक आनंददायी विषयी व्हावा,या हेतूने केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व व्यवसाय प्रशिक्षण मंडळ या संस्थेमार्फत शाळेमध्ये “मॅथ्स जीनियस ओलंपियाड” या स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती उपक्रमाचे मुख्य आयोजक धिरज बक्षी यांनी यावेळी सांगितले.शनिवारी(दि.२) स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या करंजी शाळेतील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना गोल्ड,सिल्वर,ब्राँझ आणि काॕपर पदक देत सन्मान करण्यात आला.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारोती जुवारे,ग्रा.पं.सदस्य समीर निमगडे,तंटामुक्ती अध्यक्ष वैभव निमगडे,शाळेचे मुख्याध्यापक सुनिल कोहोपरे,उपक्रमाचे मुख्य आयोजक धिरज बक्षी,अंबादास वासेकर,नितीन रायपुरे,चेतन बक्षी आदीसह शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.