आलापल्ली:स्पर्धा हे कोणत्याही कोणत्याही सभ्यतेचा विकसित झाल्याचे लक्षण आहे.ज्या सभ्यता खेळामध्ये पुढे असतात ते इतर बऱ्याच गोष्टींमध्ये पुढे असल्याचं प्रामुख्याने दिसतं त्यासोबतच शाळेच्या अनुषंगानी खेळ खेळल्याने ताणतणाव नष्ट होतात आणि त्याच्यामुळे मुलं एकाग्रपणे अभ्यासमध्येही पुढे जाऊ शकतात असे प्रतिपादन अहेरीचे प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे यांनी केले.
ते पेरमिली येथील शासकीय आश्रम शाळेत सुरू असलेल्या प्रकल्प स्तरीय क्रीडा संमेलनात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.यावेळी उदघाटक म्हणून पेरमिली चे माजी सरपंच प्रमोद आत्राम,सह उदघाटक म्हणून पोलीस उपनिरीक्षक धनराज कोळी,सीआरपीएफ चे व्ही.पी.नरेंद्र सर,विशेष अतिथी म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक वाघाडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवलेश आत्राम, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (प्रशासन) एस डी वसावे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) एस पी डोंगरे,वरिष्ठ आ.वि. वि.मट्टामी, मुख्याध्यापक एस बी मवलीकर,शा. व्य. समिती सदस्य रंजिता मुडावार,ग्रा.प सदस्य सपना बंडमवार तसेच इतर मुख्याध्यापक उपस्थित होते.
पुढे बोलताना शालेय जीवनात शिक्षणासोबत खेळही तेवढेच महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी प्रत्येक स्पर्धेत भाग घेतले पाहिजे. स्पर्धेत प्रत्येक जण जिंकण्यासाठीच भाग घेत असतात मात्र दोन पैकी एकच संघ कोणता संघ कश्या पद्धतीने खेळला याला जास्त महत्व असते.चांगला खेळ खेळुनही आपण कधी कधी अटीतटीच्या सामन्यात हार पत्करावा लागतो.त्यामुळे खचून न जाता खेळामध्ये सातत्य ठेवण्याचे काम केले पाहिजे.असा विध्यार्थी खेळाडूंना त्यांनी मोलाचा मार्गदर्शन केला.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी अंतर्गत खमनचेरू, जिमलगट्टा, मुलचेरा आणि बामणी या चार केंद्रातील ६८७ विद्यार्थी या क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला असून २५ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर पर्यंत याठिकाणी वैयक्तिक आणि सांघिक खेळ खेळले जाणार आहे. यातील उत्कृष्ट खेळाडूंना विभागीय स्तरावर संधी मिळणार असल्याने सर्वच खेळाडू आपले क्रीडा कौशल्य दाखविण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसून आले.
मान्यवरांच्या उपस्थितीत मुलचेरा आणि खमनचेरू या दोन चमू मध्ये १७ वर्षीय वयोगटातील कबड्डी सामना रंगला.उदघाटनिय सामन्यात अत्यंत चुरशीची लढत झाली असून मुलचेरा संघाने बाजी मारली.