मूल (प्रतिनिधी): सुरजागड लोह प्रकल्पातील कच्चा माल नेण्यासाठी खमनचेरू पार्कींग यार्ड मध्ये वाहन उभे करून आराम करीत असलेले वाहन चालक सचिन प्रभाकर तिवाडे यांना दुसऱ्या वाहन चालकाच्या हलर्गीजणामुळे त्यांचा अपघात होवुन ते जागीच ठार झाल्याची घटना अहेरी पोलीस स्टेशन हदीतील खमनचेरू पार्कींग यार्ड मध्ये 23 नोव्हेंबर रोजी घडली. अहेरी पोलीस स्टेशन मध्ये वाहनचालकावर गुन्हा दाखल केला आहे. परंतु कुटुंबातील कर्ता व्यक्ती मृत्युमुखी पडल्याने संपुर्ण कुटुंबिय आर्थीक विवंचनेत सापडले असुन कुटुंबाचा गाळा कसा हाकलायचा असा प्रश्न कुटुंबियांवर पडला आहे. सदर आपदग्रस्त कुटुंबियांना आर्थीक मदत करावी अशी मागणी कुटुंबियांनी केली असुन 3 दिवसात आर्थीक मदत न मिळाल्यान कुटुंबियांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसुन असा इशारा मृत्तकाची पत्नी आशाताई सचिन तिवाडे यांनी दिला आहे.
गडचिरोली जिल्हयातील एटापल्ली तालुक्यात सुरजागड लोह प्रकल्प कार्यान्वीत आहे, सदर लोहप्रकल्पातुन हजारो हायवा ट्रक मधुन कच्चा मालाची वाहतुक केली जाते, याठिकाणाहुन मोठया प्रमाणावर वाहनाची रेलचेल होत असल्याने प्रकल्प व्यवस्थापनाने अहेरी जवळ खमनचेरू पार्कींग यार्ड कंपनीने उभारले आहे. यापार्कींग मध्ये 23 नोव्हेंबर रोजी विश्वास टेंडर्स ट्रक चालक सचिन प्रभाकर तिवाडे वय 35 वर्षे हे आपले वाहन क्रं. सीजी 08 एबी 2986 हे वाहन सुरजागड लोह प्रकल्प कंपनीतील कच्चा माल भरून नेण्यासाठी नंबर लावुन थांबलेला होता. दरम्यान ट्रक टेªलर क्रं. एम एच 40 सी एम 7719 च्या मागील टायरखाली दबुन त्यांचा मृत्यु झाला. पार्कींग यार्डमधील विज पुरवठा पहाटे 4 वाजता दरम्यान खंडीत झाली होती त्यावेळी सदर अपघात घडला असावा अषी शंका यावेळी पार्कींग यार्ड मधील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
अहेरी पोलीसांनी संशयीत आरोपी वाहन चालक सोहन घणराम सिरसाम वय 28 वर्षे रा. परसिया झॉकी छिन्दवाडा याला अटक करून भादवी 279, 302 अ, मोटर वाहन अधिनियम 1988 कलम 184 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अहेरी पोलीस करीत आहे.
मृत्तकाच्या कुटुंबियांना आर्थीक मदत करा: मंगेश पोटवार
मूल तालुक्यातील उश्राळा येथील सचिन प्रभाकर चिताडे हा सुरजागड लोहप्रकल्पामधील कच्चा मालाची वाहतुक करण्यासाठी खमनचेरू पार्कींग यार्ड मध्ये ट्रक उभे करून वाहनाचा नंबर लावुन असताना एका ट्रक ट्रेलरने त्याला धडक दिल्याने तो जागीच ठार झाला, कुटुंबातील कर्ता व्यक्ती अपघातात ठार झाल्याने तिवाडे कुटुंबिय आर्थीक संकटात सापडलेला आहे, त्यांच्या कुटुंबियांना कंपनीने आर्थीक मदत करावी अन्यथा कच्चा माल घेवुन येणारे वाहन मूल तालुक्यातील केळझर मालधक्का यार्डवर येवु देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मूल तालुकाध्यक्ष मंगेश पोटवार यांनी दिला आहे.