गडचिरोली : स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे कार्य व त्यांच्या दृष्टीकोनातून तत्कालीन परिस्थितीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती येणाऱ्या पिढीपर्यंत पोहचविन्या करिता त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने “आधुनिक भारताच्या निर्मितीत पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांचे योगदान” या विषयाला घेऊन निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन कात्रटवार सभागृह गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले.
स्व. पंडित जवाहरलालजी नेहरू आणि स्व. इंदिराजी गांधी यांच्या प्रतिमेला पुस्पहार घालून स्पर्धेचे उदघाट्न माजी खासदार मारोतराव कोवासे यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हुणुन जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, मुख्य अतिथी म्हुणुन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव डॉ.नामदेव किरसान, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्व्जीत कोवासे, महिला जिल्हाध्यक्ष कविता मोहरकर, काँग्रेस नेते माजी जि. प. सदस्य ऍड. रामभाऊ मेश्राम, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, ओबीसी सेल कार्याध्यक्ष दिवाकर निसार, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, ग्राहक सेल अध्यक्ष भारत येरमे, शिक्षक सेल अध्यक्ष दत्तात्रय खरवडे, सोशल मीडिया सेल अध्यक्ष संजय चंने, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, काँग्रेस नेते प्रभाकर वासेकर, पांडुरंग घोटेकर, हरबाजी मोरे, प्रभाकर कुबडे, जितेंद्र मुनघाटे, महादेव भोयर, सुभाष धाईत, भैय्याजी मुद्दमवार, ढिवरू मेश्राम, चारुदत्त पोहने, उत्तम ठाकरे, बाबुराव गडसूलवार, केशव मुनघाटे, यादवजी गोमस्कार, अरविंद मेश्राम, योगेंद्र झंजाळ,महिला तालुकाध्यक्ष कल्पना नंदेशवर, ज्योती मेश्राम, शिवराम कुमरे, अर्चना जनगणवाड, शीतल आंबोरकर सह मोठ्या संख्येने मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते.
निबंध स्पर्धेत प्रथम गणेश कोवे(गडचिरोली), द्वितीय अंकित बांबोळे(गडचिरोली), तृतीय विशाल मेश्राम(गडचिरोली), तर वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आकाश कडूकर (चंद्रपूर), द्वितीय विनय पाटील (नागपूर) तृतीय वृषभ मेश्राम (गडचिरोली) यांनी पटकवीला सर्व विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे रोख रक्कम ५ हजार , ३ हजार , २हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तर वक्तृत्व स्पर्धेत प्रोत्साहन पुरस्कार देऊन प्रसाद म्हशाखेत्री ला गौरविण्यात आले.
स्पर्धेचे परीक्षण ऍड. कविता मोहरकर, सेवानिवृत्त नायब तहसीलदार प्रभाकर कुबडे, प्रा. डॉ. पंकज नरुले यांनी केले, कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन अनुप कोहळे यांनी केले.