जीव मुठीत घेऊन करावा लागतो झाडगांव – वर्धा मार्गावर प्रवास
वर्धा / प्रशांत अवचट :- तालुक्यातील झाडगाव ,दिग्रज परिसरात गौण खनिजाचे मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरु आहे . झाडगाव वर्धा मार्गाने या अवैध गौण खनिजाची ओव्हरलोड वाहतूक केल्या जाते . त्यामुळे या मार्गावर विविध ठिकाणी खड्डे पडले असून भरधाव येणाऱ्या वाहनांमुळे जीव मुठीत घेऊन येथील नागरिकांना प्रवास करावा लागत आहे . या वाहतुकीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी वर्धा येथील जिल्हाधिकारी कार्यालय गाठत नियमबाह्य गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे .
ग्राम पंचायत कार्यालय झाडगांव हद्द्दीतील दिग्रज ,झाडगांव येथुन अवैद्य गौण खनिज वाहतुक सुरु असुन त्यामुळे गावातील लोकांना नाहक त्रास सहन करा लागत आहे. झाडगांव – वर्धा रस्ताने गौण खनिज वाहतुक करणारे ट्रक ओव्हर लोड वाहतूक करीत असून वेगाने वाहन चालवीत असल्याने या रस्त्याने ये- जा करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर ओव्हरलोड वाहतूक करत असल्याने ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. याकडे स्थानिक प्रशासन व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष असून खुलेआम चालणाऱ्या या प्रकाराला प्रशासनाची मूक संमती तर नाही ना अशी खमंग चर्चा सध्या नागरिकात केल्या जात आहे .
प्रशासन सुस्त आणि अवैध व्यवसायिक मस्त अशी परिस्थिती सध्या परिसरात बघायला मिळत असून तुम्हीच सांगा ना हो साहेब आम्ही प्रवास कसा करायचा असे नागरिक आता विचारायला लागले आहे.भरधाव चालणाऱ्या वाहनांमुळे भविष्यात मोठी दुर्घटना झाल्यावर प्रशासन जागे होईल का , नागरिकांचा जीव जाण्याची वाट प्रश्न व लोकप्रतिनिधी बघतंय का असे एक ना अनेक प्रश्न प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधी यांनी निद्रा अवस्थेत असल्याचे सोंग घेतल्याने नागरिकां समोर निर्माण झाल्याचे येथील त्रस्त झालेल्या नागरिकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले . प्रशासन कुठलीही ऍक्शन घेत नसल्याने या अवैध व्यवसायिकांशी यांचेही साटेलोटे नाही ना अशी म्हणायची वेळ आली आहे. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन झाडगांव – वर्धा रस्ताचे बांधकाम त्वरित करून अवैद्य गौण खनिज वाहतुक करणाऱ्या वाहनांवर योग्यती कारवाई करावी अशी मागणी वाहतुकीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे .