अहेरी:- लॉयड्स मेंटल्स अँड एनर्जी लिमिटेडने सुरजागड लोह खाणीत कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिस्तबद्ध व्यवहार आधारित सुरक्षेचे धडे देण्यात आले. यासाठी कंपनीतर्फे सुरजागड येथे 30 व 31 ऑक्टोबर रोजी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले या प्रशिक्षणाचा 225 अधिकारी कर्मचाऱ्यांनी शिबिरात सहभागी होत लाभ घेतला.
सदर प्रशिक्षण जगप्रसिद्ध व भारतात लोकप्रिय वर्तन आधारित सुरक्षेशेचे जनक हरबंस लाल कैला यांच्यातर्फे आयोजित करण्यात आले होते. कामाच्या ठिकाणी सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी दोन दिवसीय आयोजित प्रशिक्षण शिबिरात सुरजागड लोह खाणीतील 225 अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
व्यवहार आधारित सुरक्षा एक मुख्य संरक्षणात्मक ढाल आहे.आयएसओ 45001 द्वारा प्रमाणे या शिबिरात सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले खाणच्या सुरजागड सुरक्षा विभागाने या शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी कंपनीचे कार्यकारी संचालक आर सत्पत्ती , महाव्यवस्थापक जीवन हेदू, सुरक्षा अधिकारी मोहसीन खान, महाव्यवस्थापक गणेश सेठी व इतर अधिकारी उपस्थित होते.