अहेरी :- समाजात एकता व संघटितपणा असल्यास, त्यास माजाची प्रगती व विकास कोणीही रोखू शकत नाही व समाजाचा सर्वांगीण विकास होतो.असे प्रतिपादन करित कुणबी समाज भवनासाठी भरीव मदत करण्याची ग्वाही माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिली.
अहेरी येथील राजे धर्मराव कृषी विद्यालयाच्या प्रांगणात रविवार, २९ ऑक्टोबर रोजी अखिल कुणबी समाजाच्या वतीने कोजागिरीनिमित्त स्नेहमिलन सोहळा व समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी जि.प.च्या – माजी अध्यक्ष आशा पोहणेकर होत्या. सत्कारमूर्ती म्हणून राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त जयश्री खोंडे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त चंद्रपूर येथील परिचारिका पुष्पा पाचभाई, दिनकर जीवतोडे, वामन देवाळकर, विठ्ठल नागापुरे, महादेव मस्की, जीवनराव गोंडे, प्रमुख अतिथी म्हणून कुमार
अवधेशरावबाबा आत्राम, पोलीस उपनिरीक्षक करिष्मा मोरे, प्रा. डॉ. संतोष डाखरे आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी, समाजाच्या वतीने राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्कारमूर्तीसह इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंतांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान, राजे विश्वेश्वरराव महाविद्यालय भामरागडचे प्रा. डॉ. संतोष डाखरे यांच्या ‘विश्वातील अपरिचित देश आणि भारत’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. प्रास्ताविक प्रवीण बुराण यांनी केले. संचालन जीजा गोहोकर तर आभार मारोती गौरकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी आशा पोहणेकर, दिवाकर वाघमारे, प्रवीण बुरान, यादव धानोरकर, मारोती गौरकर, मारोती पिपरे, प्राचार्य अनिल भोंगळे, गिता जीवतोडे, शालिक म्हशाखेत्री, घनमाला जामुनकर आदींसह समाजबांधवांनी सहकार्य केले.