गोंडपिपरी -गोंडपीपरी काँग्रेस शहर अध्यक्ष देवेंद्र
बट्टे यांची पक्षाशी असलेली एकनिष्ठा बघुन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी देवेंद्र बट्टे यांची चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्षपदी पदी नियुक्ती केली.सोबतच राजू झाडे यांना गोंडपिपरी काँग्रेस कमिटीच्या शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन तसे नियुक्तीपत्र प्रदान केले.यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सोनिया गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मार्गदर्शनात संघटन वाढवणे करीता उत्तम योगदान राहील अशी आशा व्यक्त केली.यावेळी तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे,कार्याध्यक्ष निलेश संगमवार,अशोक रेचनकर,नगराध्यक्ष सविता कुळमेथे,तालुका उपाध्यक्ष नितेश मेश्राम,विनोद नागपुरे,गौतम झाडे,संभु येल्लेकर,बबलू कुलमेथे,नगरसेविका वनिता देवगडे,अनिल झाडे,रंजना रामगिरकार,संतोष चिंतावार,अजय माडुरवार, संतोष बंडावार उपस्थित होते.