अहेरी:- बातकम्मा नवरात्रोउत्सवाच्या शुभपर्वावर येथील आलापल्ली येथे शुक्रवार 20 ऑक्टोबर रोजी बातकम्मा नृत्यासह आर्केस्ट्राची धमाल झाली.
आर्केस्ट्राचे उदघाटन माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केले यावेळी बातकम्मा मंडळांचे सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते.
आर्केस्ट्राचे आयोजन बातकम्मा मंडळ आलापल्ली येथील आलापल्ली-मूलचेरा मार्गावरील वेलगुर रोड येथे बातकम्मा उत्सव शुभपर्वावर हे संपूर्ण क्षेत्रात सर्वात मोठे मंडळ म्हणून प्रसिद्ध असून माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी बातकम्मा मंडळाला भेट देत बातकम्माचे विधिवत पूजन केले ह्यावेळी मंडळाने राजेंचे जोरदार स्वागत करण्यात आले.
या क्षणी लहानापासून मोठ्या पर्यंत सर्वांनीच राजेंसोबत सेल्फी काढत छायाचित्रे घेतली. यावेळी बोलतांना राजेंनी नवरात्रोउत्सव तथा बातकम्मा उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच ह्या पुढेही मंडळाला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी याप्रसंगी आपल्या भागातील युवती व महिलांना मनोरंजना सह सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच महिलांचे सांस्कृतिक व कलेचा विकास व्हावा यासाठीच बातकम्माच्या शुभपर्वावर आर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले असून बातकम्मा मंडळ आलापल्ली कडून एक सुंदर असे आर्केस्ट्राचे आयोजन करून माझ्या हस्ते उदघाटन करून मला मान आणि सन्मान दिला त्या करिता बातकम्मा मंडळाचे आणि आयोजकांना शुभेच्छा व्यक्त करून मोलाचे मार्गदर्शनही केले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक व आलापली परिसरातील प्रेक्षकगण उपस्थित होते.