अहेरी :- इस्टेटचे सहावे राजे माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
वाढदिवसानिमित्त चाहत्यांची राजवाड्यासमोर सकाळपासूनच एकच गर्दी केली होती. त्यात भाजप चे पदाधिकारी, घरचे मंडळी एवढेच नव्हेतर दुर्गम भागातील आदिवासी बांधव ही मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.सद्या राजवढ्यात वाढदिवस कार्यक्रमांला नागरिकांची एकच गर्दी होत आहे. त्यात राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचा वाढदिवस असल्याने सर्वांचा आनंद द्विगुणित झाला होता. वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात रोषणाई,रात्रीच्या सुमारास आतिषबाजी आणि डीजेच्या गजरात सर्वांचे लक्ष वेधले व संपूर्ण अहेरी राजनगरी दणाणून सोडले.
अहेरी इस्टेटचे ६ वे राजे तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या वाढदिवस निमित्ताने दानशूर चौक, अहेरी येथे संध्याकाळी ७ वा.राजे फाऊंडेशन, अहेरी तथा दानशूरचा राजा गणेश मंडळ, अहेरी तर्फे भव्य “लाडुतुला” कार्यक्रम आयोजित केला गेला, त्यानंतर अहेरी शहरातील विविध चौकात केक कापून राजेंचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. तरी ह्या सर्व कार्यक्रमांला राजें यांच्या चाहत्यांची मोठ्या संख्येने अलोट गर्दी केली होती. भेट देणाऱ्या चाहत्यांना व शुभेच्छांसाठी जेवणाची सुध्दा व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमाला नागरिकांनी हजारोंच्या संख्येने हजेरी लावली होती. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी समस्त उपस्थितांचे आशिर्वाद घेत आभार मानले.
यावेळी राज घराण्याशी संबंधित निष्ठावंत प्राचार्य डॉ. मनोरंजन
मंडल, प्राचार्य मारोती टिपले, संतोष उरेते, गिरीश मद्देरलावार,प्राचार्य अनिल भोंगळे, प्राचार्य संजय कोडेलवर, सेवानिवृत्त प्राचार्य विजय खोंडे, प्राचार्य अरुण गोटेफोडे, प्राचार्य तगरे, मुख्याध्यापक तालिब सय्यद, मुख्याध्यापक अनिल यावले, मुख्याध्यापक वांढरे, मुख्याध्यापक दीपक राय व दिलीप राय, मुख्याध्यापक प्रभाकर भुते, मुख्यध्यापक उराडे, प्रा रमेश हलामी, प्रा. तानाजी मोरे, प्रा. अतुल खोब्रागडे, प्रा. गोंडे, पर्यवेक्षक युवराज करडे, पर्यवेक्षक हंसराज खोब्रागडे, आदर्श राज्यस्तरीय शिक्षिका जयश्री विजय खोंडे, व्यापारी संघटनेतील इतर सदस्यगण, प्रकाश गुड्डेल्लीवार, रवी नेलकुद्री, मुकेश नामेवार,अमोल गुड्डेल्लीवार, संतोष मद्दीवार, विनोद जिल्लेवार, विकास तोडसाम, राकेश कोसरे, नगरसेवक विकास उईके, माजी नगरपंचायत अध्यक्ष हर्षाताई रवींद्र ठाकरे, नगरसेविका शालिनी पोहणेकर,संजय पोहणेकर, नगरपंचायतचे आजी-माजी नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे गडचिरोली तथा अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यातील आलेले पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भला मोठा केक कापून वाढदिवस साजरा
अहेरी उपविभागातील राजघराण्याशी संबंधित गणमान्य व्यक्ती, स्थानिक व्यापारी संघटना, विविध सामाजिक संस्थांची तथा पक्षांचे पदाधिकारी तसेच धर्मराव शिक्षण मंडळातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व नगरातील वार्डा- वार्डातील महिलांनी पुष्पगुच्छ व भेट देऊन राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्यावर शुभेच्छांच्या वर्षाव केला. राजमाता राणी रुक्मिणी देवी आणि कुमार अवधेशराव बाबा आत्राम आणि राजमाताच्या लहान बहीण राजकुमारी विजयश्री सिंह, प्रवीणराव बाबा,चित्तेश्वर बाबा,रामेश्वर बाबा आत्राम,विश्वनाथबाबा आत्राम, वैभव सोमकुवार या सर्वांनी भला मोठा केक कापून राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा वाढदिवस साजरा केला.
●घेतलेले विविध सामाजिक उपक्रम
राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळपासुनच विवीध ऊपक्रमांची रेलचेल राजेंच्या चाहत्यांनी दानशूरचा राजा गणेश मंडळ अहेरीकडून लाडूतुला करून मोठ्या उत्सवाने साजरा केले. एवढेच नव्हे तर सकाळपासून भाजपच्या कार्यकर्त्यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेचा वलय त्यांच्या भोवती निष्ठेने वावरताना दिसतो. इस्टेट चे लाडक्या लोकनेत्याच्या वाढदिवसा निमित्ताने अहेरी विधानसभा क्षेत्रातील अहेरी, सिरोंच्या,मूलचेरा, एटापल्ली, भामरागड अशा पाच ही तालुक्यातील विविध ठिकाणी कार्यकर्ते यांनी केक कापून, रक्तदान शिबिर, मॅरेथॉन स्पर्धा, अन्नदान, ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप, छात्रावास येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, गरजूंना कपडे वाटप अशा विविध सामाजिक उपक्रमांनी गडचिरोली जिल्ह्याचे विकास पुरुष, लोकनेते, अहेरी इस्टेट चे राजे तथा माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाच ही तालुक्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते यांच्या माध्यमातून शुभेच्छाचा वर्षांव त्यांच्यावर करण्यात आला.मागील काही महिण्यांपासुन सुरु असलेला पक्षप्रवेशाचा धडाका पुन्हा वाढदिवसानिमीत्य सुध्दा दिसला. राजेंच्या वाढदिवसाच्या औचित्य साधुन पेरमील्ली, मन्नेराजाराम परिसर आणि सिरोंचा तालुक्यातील कोटापल्ली परिसरातील असंख्य कार्यकर्त्यांनी रुक्मिणी महालात भाजप मध्ये प्रवेश केला.